लग्नानंतर (After Marriage) पती-पत्नीमध्ये कोणतंच अंतर राहत नाही असा समज असेल तर, हे वाचा. महिला बऱ्याच गोष्टी पतीपासून लपवतात (Hide Secret).
लग्नानंतर महिलांचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. आपल्या आईवडिलांना सोडून मुलगी दुसऱ्याच्या घरी येते. त्या घराला आपलंस करते आणि मग पतीच्याच घराचा एक भाग बनून जाते.
पण, कधीकधी यापेक्षा परिस्थिती वेगळी असते. मुलींना नवीन कुटूंबात एडजस्ट करता येत नाही. असं का होतं हे शोधण्यासाठी एक सर्वे करण्यात आला आहे. ज्यामध्ये महिला आपल्या पतीपासून काही गोष्टी लपवतात हे सांगण्यात आलं आहे.
या सर्वेनुसार महिला आपल्या पतीवर खुप प्रेम करत असल्या आणि त्यांचा आदर करत असल्या तरी, त्यांच्यापासून आपल्या लग्नाआधीच्या संबंधांबद्दल लपवतात आणि आपल्या EX बॉयफ्रेन्डला मनातल्या मनात आठवत असतात.
नवऱ्याने पूर्वायुष्याबद्दल विचारलं तरी, त्या प्रश्नाचं उत्तर महिला टाळतात. EX बॉयफ्रेन्डबद्दल पतीने विचारलं तरी, पतीबरोबर संबंध बिघण्याच्या भीतीने त्या काहीच सांगत नाहीत.
सासूबरोबर वाद झाला तरी, पतीबरोबर त्या विषयावर चर्चा करत नाहीत. पती आपल्या आईचीच बाजू घेईल आणि पतीशी असलेल्या नात्यावर त्याचा परिणाम होईल हा विचार त्यांच्यामनात येत असतो.
महिलांना सासरी मुलीप्रमाणे प्रेम मिळत नाही अशी तक्रार महिला करतात. तर, लग्नाला कितीही वर्ष झाली तरी, सासरच्या माणसांवर माहेरच्या माणसाप्रमाणे प्रेम करणं अशक्य असतं असं बऱ्याच महिला सांगतात.
महिला पतीबरोबर शारीरिक संबंधांबरोबर बोलणं टाळतात. पतीच्या मनात गैरसमज निर्माण होऊ नयेत असं त्यांना वाटतं.
महिलांना गप्पा मारायला खुप आवडतं. त्या आपल्या मैत्रिणींबरोबर सगळे सिक्रेट शेअर करतात. घरातल्या गोष्टीही सांगतात. पण, मैत्रिणीशी काय गप्पा मारल्या हे कदीच सांगत नाहीत.