JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / कमी वयात तुमचेही केस पांढरे झालेत का? आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

कमी वयात तुमचेही केस पांढरे झालेत का? आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

तुमच्या शरीरात व्हिटॅमिन्सची (Vitamins) कमतरता असेल, तरी केस पांढरे (White Hairs) होऊ शकतात. त्यामुळे आहाराची (Diet) काळजी घेणं गरजेचं आहे.

0107

केस पांढरे झाल्यानंतर तुम्ही त्यांना डाय करता किंवा मेहंदी लावता. मात्र कमी वयात केस पांढरे होत असतील तर तुम्हाला काही पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे.

जाहिरात
0207

अंड्याचा बलक - अंड्याच्या आतील पिवळ्या भागात व्हिटॅमिन्स असतात, जे तुम्हाला पांढऱ्या केसांच्या समस्येतून सुटका देतात. याशिवाय तुमच्या केसांना प्रोटिन आणि मिनरल्ससारखे पोषक घटकही मिळतात.

जाहिरात
0307

मशरूम - मशरूममधील व्हिटॅमिन्स पांढऱ्या केसांची समस्या कमी करण्यात मदत करतात. शिवाय डोक्याच्या त्वचेला येणारी खाजेची समस्याही दूर होते. मशरूममुळे केसांना आवश्यक पोषक घटकही मिळतात ज्यामुळे केसातील कोंडा, केस तुटण्याची समस्या कमी होते.

जाहिरात
0407

साल्मन - साल्मनमध्ये व्हिटॅमिन्सशिवाय ओमेगा-3 फॅटी अॅसिडही असतं. जे केसांच्या विकासासाठी फायदेशीर असतं. पांढऱ्या केसांची समस्याही दूर होते. यातील पोषक घटक केसांना मजबूत बनवतात आणि केस तुटत नाहीत.

जाहिरात
0507

दही- दह्यात केसांसाठी फायदेशीर असलेले व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर तर होतेच, शिवाय केस चमकदारही होतात. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना दही लावल्यानं पांढऱ्या केसांची समस्या कमी होईल.

जाहिरात
0607

गाजर - गाजरातील घटक केसांना लवकर पांढरे होण्यापासून रोखतात. गाजर खाल्ल्याने केसांची वाढही चांगली होते.

जाहिरात
0707

सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही. अंमलबजावणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या