शरीरसंबंधांविषयी अतिउत्साह, अतिविचार किंवा ताण हे परफॉर्मन्स एन्झायटीचं मूळ कारण आहे. तुम्हालाही ही लक्षणं दिसली तर वेळीच लक्ष द्या.
मानसिक तणाव,भीती आणि चिंता यामुळे बऱ्याच जणांना लैंगिक जीवनाचा आनंद घेता येत नाही. परफॉर्मन्स एन्जायटीमुळे सेक्स लाईफ खराब होतं. या समस्येतून बरं होण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
कॅलिफोर्नियाचे सेक्स थेरपिस्ट जीन पप्पलार्डो यांच्यामते एन्जायटीमुळे लैंगिक संबंधांच्यावेळी शरीर उत्तेजित होऊ शकत नाही. जेव्हा सेक्स आणि इन्टमसी याच्याबद्दल मनात चिंता वाढते, तेव्हा एन्जायटी बनते. याला आपल्या काही सवयीही कारणीभूत ठरतात.
सेक्सच्यावेळी मनात परफॉर्मन्स बद्दल जास्त विचार करत राहिल्याने हा त्रास होतो. मनात असल्याप्रमाणे करायला जमेल का? पार्टनर खुश होईल का? याच कल्पनाविलासात राहिल्याने ‘त्यावेळी’ आनंद घेता येत नाही.
सेक्स थेरपिस्ट डेबोराह फॉक्स म्हणतात,एन्जायटीमुळे लोकांना अनेकदा रिलॅक्स होता येत नाही.त्यामुळे त्यांच्या लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो. आपली एन्जायटी दूर करण्यासाठी ते लोक इतके प्रयत्न करतात की सेक्स लाईफ एन्जॉय करता येत नाही.
ज्यांना परफॉर्मन्स एन्जायटी असते, त्यांच्यात काही लक्षणं दिसतात. हृदयाची धडधड, वेगाने श्वासोच्छवास, पोटात गोळा येणे. डिप्रेशन आणि सेक्स करण्याची इच्छा कमी होणं यामुळे लैंगिक जीवनाबरोबरच दैनंदिन जीवनावरही परिणाम होतो.
सेक्स थेरपिस्ट म्हणतात की एन्जायटीमुळे रक्त प्रवाहात अडथळा येतात. एन्जायटी महिलांच्या योनीचे स्नायू आणि मसल्स आकुंचन पावतात. यामुळे सेक्स दरम्यान वेदना होतात. बरेच लोक आधीच्या अनुभवाचा विचार करून टेन्शन घेतात.सेक्स थेरपिस्ट म्हणतात की एन्जायटीमुळे रक्त प्रवाहात अडथळा येतात. एन्जायटी महिलांच्या योनीचे स्नायू आणि मसल्स आकुंचन पावतात. यामुळे सेक्स दरम्यान वेदना होतात. बरेच लोक आधीच्या अनुभवाचा विचार करून टेन्शन घेतात.
एन्जायटीमुळे एन्ड्रनालाईन नावाचा स्ट्रेस हार्मोन तयार होतो. त्यामुळे ब्लड फ्लो जनेनंद्रीयापर्यंत जात नाही. परुषांमध्ये हळूहळू इरेक्टाईल डिसफंगक्शन होतं.
परफॉर्मन्स एन्जायटी असेल तर, पार्टनरला याची कल्पना द्या. त्यामुळे तुमचं नातं खराब होणार नाही. सेक्स संबधी पार्टनरबरोबर बोल्यास गैरसमज होणार नाहीत. त्यामुळे बेड परफॉर्मन्स खराब होणार नाही. याशिवाय एखाद्या थेरेपिस्टचा सल्ला घ्या.
अतिविचार हे परफॉर्मन्स एन्जायटीचं मुळ कारण आहे. सेक्स लाईफ बद्दल विचार करण्यापेक्षा आपल्या पार्टनर बरोबर त्या वेळेचा आनंद घ्या. त्यामुळे तणावही येणार नाही. सेक्सोलॉजिस्टच्या मते शारीरिकच नाही तर, मानसिकरित्या आपल्या पार्टनर जवळ राहिल्यास परफॉर्मन्स एन्जायटीचा त्रास होत नाही. याशिवाय ब्रिदिंग एक्ससाईही करू शकता.