JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / International Tea Day 2021: चहाप्रेमींसाठी खास 5 प्रकारचे चहा, सर्दी-खोकल्यावर ठरतील रामबाण उपाय

International Tea Day 2021: चहाप्रेमींसाठी खास 5 प्रकारचे चहा, सर्दी-खोकल्यावर ठरतील रामबाण उपाय

International Tea Day 2021: ताजंतवानं वाटावं यासाठी आपण चहा पितो. पण, काही आयुर्वेदिक चहा इम्युनिटी मजबूत करण्यासाठी आणि सर्दी-खोकला बरा करण्यासाठीही फायदेशीर आहेत.

0107

तुम्ही चहा पिण्याचे शौकीन आहात? तुमच्या दिवसाची सुरुवातही चहाच्या कपाबरोबर होते? तर, आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. कारण, आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस (International Tea Day 2021) आहे.

जाहिरात
0207

चहा हा आपल्यासाठी सकाळचे पेय्य आहे. तर, स्ट्रेस (Stress), टेन्शन (Tension) किंवा सर्दी, पडसं यासारख्या त्रासातही चहा उपायकारक आहे. आयुर्वेदिक चहा रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि सर्दी पडसं बरं करण्यास उपयुक्त आहेत. चला जाणून घेऊया अशा सर्व आयुर्वेदिक चहांबद्दल.

जाहिरात
0307

कॅमोमाइल चहा - कॅमोमाइल चहा (Chamomile Tea) प्यायल्याने घशातील सूज कमी होते. कॅमोमाइलमध्ये विशिष्ट गुणधर्म असतात जे बॅक्टेरिया दूर करतात. सर्दी झाल्यास कॅमोमाईल चहाचं सेवन देखील फायदेशीर ठरतं.

जाहिरात
0407

लेमन टी - लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. अँटी बॅक्टेरियल आणि अँन्टीमायक्रोबियल्स गुणधर्म असतात,जे सर्दीविरोद्धात लढायला मदत करतात. मध घातलेला लिंबाचा चहा (Lemon Tea)एक सर्वात प्रभावी आयुर्वेदिक औषध आहे, म्हणून जेव्हा सर्दी असेल तेव्हा हा चहाचा प्यावा.

जाहिरात
0507

ग्रीन टी - ग्रीन टी (Green Tea) देखील आरोग्यासाठी खूप चांगली आहे. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात. यात अँटीऑक्सिडेंट असतात. एवढंच नाही तर, ग्रीन टी बर्‍याच प्रकारच्या संक्रमणापासून संरक्षण करते. सर्दी झाली असेल तर, ग्रीन टी पित रहावी.

जाहिरात
0607

हळदीचा चहा - हळदीमध्ये बरेच अँटीबॅक्टीरियल गुण असतात. यात कर्क्युमिन नावाचा एक विशेष घटक असतो. जो सर्दी आणि घशातील खवखव यी खोकल्याची लक्षणं दूर करण्यास मदत करतो. हळदीचा चहा (Turmeric Tea) बनवण्यासाठी लिंबाचा रस आणि हळद एक कप पाण्यात उकळवा,नंतर त्यात मध घालून प्या. हा चहा आरोग्यदायी आहे आणि घसा चांगला ठेवण्यासही मदत करतो.

जाहिरात
0707

आल्याचा चहा - आल्याच्या चहा (Ginger Tea)मध्ये अँटी-व्हायरल कम्पाऊंड असतात,जे शरीराला संसर्गापासून वाचवतात. या व्यतिरिक्त, या चहाने शरीर उबदार राहतं, ज्यामुळे सर्दी पडसं लवकर बरं होण्यास मदत होते. आल्याचा चहा थंडीत पिणं चांगलं असतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या