JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / तिसरा टप्पा पूर्ण होण्याआधीच देणार CORONA VACCINE; आपात्कालीन वापरासाठी मिळणार मंजुरी

तिसरा टप्पा पूर्ण होण्याआधीच देणार CORONA VACCINE; आपात्कालीन वापरासाठी मिळणार मंजुरी

कोरोना लशीच्या (corona vaccine) आपात्कालीन वापरासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

0106

ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रेझेनका-सीरम इन्स्टिट्युट, फायझर-बायोएनटेक आणि मॉडर्ना कंपनीच्या कोरोना लशी परिणामकारक दिसून आल्या आहेत. त्यामुळे आता आशा अधिक पल्लवित झाल्या आहेत. पुढील वर्षापर्यंत कोरोना लस उपलब्ध होईल अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र याच वर्षात या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

जाहिरात
0206

यूएसमधील फायझर (Pfizer Inc) आणि जर्मनमधील बायोएनटेक (BioNTech) कंपनीनं तयार केलेली कोरोना लस तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 95%  प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.

जाहिरात
0306

तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या सुरुवातीच्या परिणामांमध्ये सौम्य ते तीव्र स्वरूपाच्या COVID-19 वर ही लस उत्तमरित्या काम करते असं स्पष्ट झालं. त्यामुळे आता या लशीच्या आपात्कालीन मंजुरीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

जाहिरात
0406

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे फायझर कंपनीनं कोरोना लशीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.

जाहिरात
0506

प्रभावी आणि सुरक्षित अशी लस असल्याचा पुरावा मिळाल्यानं ही लस आपात्कालीन वापरासाठी योग्य आहे. त्यामुळे तिसरा टप्पा पूर्ण होण्याआधीच प्रशासन या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देईल, अशी आशा कंपनीला आहे.

जाहिरात
0606

डिसेंबरमध्येच ही लस वापरली जाण्याची शक्यता आहे. ख्रिसमसआधीच ही लस उपलब्ध होऊ शकते. यानंतर जानेवारीत 30 दशलक्ष, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये 35 दशलक्ष डोस उपलब्ध होतील, अशी माहिती नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिसीनमध्ये देण्यात आली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या