कांद्याचे भाव (Rates)वाढायला लागले की गृहिणींचं टेन्शन (Tension) देखील वाढायला लागतं. कारण कांद्याशिवाय कोणतीही भाजी बनवणं कठीण असतं.
बरेच लोक कांदा महाग होण्याच्या भीतीने उन्हाळ्या मध्येच कांदे साठवून ठेवतात. यामुळे पावसाळ्यानंतर कांद्याचे भाव वाढायला लागले तरी बजेटवर त्याचा परिणाम होत नाही मात्र, बऱ्याच वेळा साठवलेले कांदे खराब होतात आणि यामुळे नुकसान होतं.
त्यामुळे कांदे खराब होऊन होणारं नुकसान टाळण्यासाठी गृहिणींनी कांदे खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे पावसाळ्यातही खराब कांदे घरी आणावे लागणार नाहीत.त्यामुळे कांदे खराब होऊन होणारं नुकसान टाळण्यासाठी गृहिणींनी कांदे खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे पावसाळ्यातही खराब कांदे घरी आणावे लागणार नाहीत.
कांद्यामधून खराब वास येत असेल तर, तो कांदा सडायला सुरुवात झालेली आहे असं समजावं. कांदा नेहमीच आतून सोडतो त्यामुळे बाहेरून चकचकीत दिसणारा कांदा आतमधून खराब असू शकतो.
याकरता कांदा खरेदी करताना त्याच्या वासावर लक्ष द्या. कांद्याला उग्र वास येत असेल तर, तो कांदा आतमधून सडत आहे असं समजा. असा कांदा मुळीच खरेदी करू नका.
कांद्याची साल निघालेली असेल तर, असा कांदा घेऊ नका. साल निघालेला कांदा जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे सध्या कांदा मोठ्या प्रमाणात विकत घेऊन स्टोर करण्याचा विचार करत असाल तर, साल चांगली असलेला कांदाच विकत घ्या.
कांदा खरेदी करताना त्याच्या रंगाकडे लक्ष द्या. तांबूस रंगाचा कांदा जास्त दिवस टिकतो आणि चवीला गोड असतो. याशिवाय गुलाबी जांभळ्या रंगाचा कांदा देखील खरेदी करू शकता.
कांद्याच्या खालच्या भागाकडे लक्ष द्या जुन्या कांद्यामधून मोड निघायला सुरुवात होते. मोड निघणारा कांदा आत मधून सोडलेला असतो. त्यामुळे कांद्याच्या मुळांकडचा भाग वाळलेला असणे अत्यंत आवश्यक असतं.
नेहमी मध्यम आकाराचा कांदा खरेदी करा. मोठ्या आकाराचा कांदा दर वेळी पूर्णपणे वापरता येतोच असं नाही. कांदा कापून ठेवल्यानंतर त्यामध्ये विषारी घटक तयार व्हायला लागतात.
याउलट छोट्या आकाराचा कांदा कापताना त्रास होतो. कांदा काल्यानंतर फार छोटा भाग वापरण्यायोग्य राहतो. यामुळे कांदा खरेदी करताना मीडियम साईजचा कांदा घ्यावा.