JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / मुलांच्या निकोप वाढीसाठी करू नका ‘या’ चुका, पालकांनी बदला चुकीच्या सवयी

मुलांच्या निकोप वाढीसाठी करू नका ‘या’ चुका, पालकांनी बदला चुकीच्या सवयी

आपण आपल्या मुलांशी ज्या पद्धतीने वागतो त्याचं प्रतिबिंब मुलांच्या व्यक्तिमत्वात दिसतं. त्यामुळे पालकांनी आपल्या चुकीच्या सवयी बदला.

019

चांगला समाज घडवण्यात मुलांचं संगोपन हे सर्वात मोठं योगदान आहे. लहानपणीचा अनुभव एखाद्या व्यक्तीच्या आत्मविश्वासावर (Confidence) परिणाम करतो. त्यामुळे आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता (Independence) वाढते किंवा कमी होते, ज्याला स्वतः पालकही जबाबदार असू शकतात.

जाहिरात
029

मुलांच्या निकोप वाढीसाठी पालकांनी त्यांना मोटिवेट करणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक मुलाला आपल्या पालकांनी आपलं कौतुक करावं असं वाटतं असतं.

जाहिरात
039

आपल्याला मुलाच्या छोट्याछोट्या गोष्टींवर हसू येऊ शकतं, पण कदाचित मुलाने प्रशंसा मिळवण्यासाठी खूप कष्ट केले असतील आणि तुमच्या हसण्यामुळे तो कोमेजून जाईल. त्यामुळे त्याची चेष्टा करू नये. असं केल्याने, मुलं प्रयत्न करणं थांबवतील.

जाहिरात
049

प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येकाच्या स्वतःच्या काही सवयी असतात. बर्‍याच कुटुंबांमध्ये मुलांची तुलना करण्याची सवय असते. या सवयीने मुलांच्या मनात इतर मुलांबद्दल चिड आणि मत्सर वाढू शकतो.

जाहिरात
059

बालपणात कोणतंही मूलं प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, मूलं काही अ‍ॅक्टिविटी करत असतील तर, त्याला ती करू द्या. त्यात दोष काढण्याऐवजी त्याच्या चांगल्या गोष्टींची स्तुती करा.

जाहिरात
069

बरेच पालक आपल्या मुलांची बाहेरच्या लोकांकडे तक्रार करत असतात. बरेच लोक फक्त गप्पा मारण्याच्या उद्देशाने मुलाचे वाईट गुण सांगत बसतात.

जाहिरात
079

याचाच मुलांच्या मनावर खूप खोल परिणाम होतो आणि मुलं डिप्रेशनमध्ये जातात. ज्याचा परिणाम नंतर त्यांच्या आत्मविश्वासावर होतो.

जाहिरात
089

मुलांना प्रत्येक गोष्टीत मारहाण केली तर, आपण खूप वाईट आहोत, आपण कोणालाही आवडत नाहीत अशी भावना त्यांच्या मनात येत राहते.

जाहिरात
099

त्यांना स्वत:बद्दल असुरक्षित वाटत राहतं आणि हीच त्यांची भावना मनात कायम राहते. त्याचा प्रभाव मोठं होईपर्यंत त्यांच्या व्यक्तीमत्त्वावर होतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या