पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातने (Pakistani Actress Mehwish Hayat) पाकिस्तानच्या स्वातंत्रदिनी देशवासियांनी शुभेच्छा दिल्या पण, तिथल्या लोकांनी भलत्याच विषयावर चर्चा सुरू केली. दाऊद इब्राहिम सोबत या अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं होतं.
मेहविश हयात पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. पाकिस्तानचे अनेक चित्रपट आणि टीव्ही सिरीयल मध्ये ती झळकली आहे. सौंदर्य आणि अभिनयामुळे मेहविश पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध आहे. याशिवाय सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोविंग आहे. इंस्टाग्रामवर तिला 4.3 मिलियन फॉलोवर्स आहेत.
मात्र मेहविश वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने पाकिस्तानच्या स्वतंत्र दिनी पाकिस्तानचा झेंडा हातामध्ये घेऊन एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यासोबत आपल्या देशवासीयांसाठी एक संदेशही लिहिला.
मेहविशने आपल्या फोटो सोबत शेअर केलेल्या मेसेजमध्ये सगळ्या पाकिस्तानी लोकांना आपल्या पूर्वजांचा आदर्श ठेवून आयुष्य जगण्याचा सल्ला दिला. मात्र लोकांनी त्यांच्या मेसेजचा अर्थ समजण्या ऐवजी वेगळ्याच चर्चेला तोंड फोडलं.
मेहविश यांनी या फोटोमध्ये सफेद रंगाचा कुर्ता घातलेला आहे आणि त्यांचा हातामध्ये पाकिस्तानचा झेंडा आहे. मात्र काही लोकांना त्यांचं सौंदर्य दिसण्याऐवजी त्यांचं लक्ष त्यांच्या कपड्यांकडे गेलं. मेहविश यांनी या कुर्त्यासोबत कोणत्या रंगाची ब्रा घातलेली आहे यावरच चर्चा सुरू झाली.
मेहविशच्या फोटोवर अतिशय घाणेरडे कमेंट यायला सुरुवात झाली. त्यानंतर मेहविश यांनीदेखील इन्स्टा स्टोरीवर आपलं रागही व्यक्त केला.
तिने इंस्टाग्रामवर अतिशय तिखट शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे. मेहविशने आपला फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “या पोस्टवर अतिशय घाणेरडे कमेंट आले आहेत. यावरूनच लोकांची वृत्ती किती निर्लज्ज आणि घाणेरडी आहे हे स्पष्ट होतंय. हे लोक माझ्या ब्राच्या रंगा वर चर्चा करतात. ती काळी, राखाडी की हिरव्या रंगाची आहे यावर चर्चा सुरू आहे. मात्र, मला कल्पना आहे या समाजामध्ये किती कोत्या वृत्तीचे लोक भरलेले आहेत”.
मेहविशने आणखी एक इन्सस्टा स्टोरी शेअर केलेली आहे. त्यांनी लिहीलय की, समाजामध्ये आणखिन बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाऊ शकते. मात्र, त्यासाठी आपली ताकद त्या मुद्द्याकडे वळवायला हवी.
मेहविश हयात या पाकिस्तानी अभिनेत्रीने 2010 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली आणि आपल्या अभिनयामुळे ते यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचली.
दाऊद इब्राहिम सोबत देखील मेहविशचं नाव जोडला गेलेला आहे मात्र, या केवळ चर्चा आहे की यामध्ये काही तथ्य आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.