JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / OMG! शरीरावर अशी एकही जागा नाही जिथं गाठ नाही; या महिलेला नेमकं झालंय तरी काय?

OMG! शरीरावर अशी एकही जागा नाही जिथं गाठ नाही; या महिलेला नेमकं झालंय तरी काय?

या महिलेच्या शरीरावर 200 पेक्षाही जास्त गाठी आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 28 जुलै: एखाद्याच्या मानेवर किंवा शरीरावर एखादी गाठ (Tumor) आल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण कोणत्या अशा व्यक्तीला पाहिलं आहे का जिच्या संपूर्ण शरीरावरच (Tumor on body) अशा गाठी असतील. किंबहुना तिच्या शरीराचा एकही भाग असा नसेल जिथं अशी गाठ नाही. सध्या अशाच एका महिलेची चर्चा होते आहे. या महिलेच्या शरीरभर गाठी पसरलेल्या आहेत. यूएस व्हर्जिन आइसलँडच्या सेंट क्रोक्समध्ये (St Croix, US Virgin Islands) राहणारी 33 वर्षांची जमिला गोर्डनने (Jamila Gordon) आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपला अनुभव मांडला आहे. फोटोत तिच्या शरीरावर गाठीच गाठी दिसत आहेत. या गाठी पाहून प्रत्येक जण हैराण झाला आहे. या गाठी नेमक्या कसल्या आहेत, या महिलेला नेमकं झालं तरी काय आहे, असाच प्रस्न तुम्हाला पडला असेल. जमिलाने सांगितल्यानुसार, ती लहान असताना तिच्या पोटावर एक गाठ आली होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला न्युरोफाइब्रोमॅटोसिस (Neurofibromatosis) असल्याचं निदान झालं. ही एक जेनेटिक स्थिती आहे, ज्यामध्ये नसांजवळ ट्युमर विकसित होतात. जमीलाचं जसजसं वय वाढत गेलं तसतसं तिच्या शरीरावरील हे ट्युमरही वाढत आणि पसरत गेले. तिने दिलेल्या माहितीनुसार सर्जरी करून तिने काही ट्युमर हटवले होते पण ते पुन्हा आले. हे वाचा -  फक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी? घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST जमिला सांगते, “असे ट्युमर माझ्या संपूर्ण शरीरावर आणि माझ्या पायांखालीसुद्धा आहे, ज्यामुळे मला चालणंही कठीण होतं. माझ्या शरीरावर जवळपास 200 पेक्षा जास्त ट्युमर्स असतील. यामुळे मला खूप वेदना होतात आणि खाजही येते” या ट्युमर्समुळे जमीलाच्या आत्मविश्वासावरही परिणाम झाला. लोक तिला विचित्र नजरेने पाहतात आणि मग ती निराश होते.  “जेव्हा मी लहान होते तेव्हा मला शाळेत चिडवायचे. मला शिक्षण घेणंही कठीण झालं होतं. त्यामुळे मला शाळेत जावंसं वाटत नव्हतं.  लहान मुलं माझ्याकडे पाहतच राहतात. काही लोक फक्त उभे राहून मलाच पाहतात. काही जण मला याबाबत विचारतातसुद्धा”, असं जमिला म्हणाली. लोकांना तिच्याजवळ जाणं आवडत नाही. यामुळे तिने नोकरीही गमावली आहे. हे वाचा -  ब्लड शुगर कंट्रोलसाठी रोज खा काळे चणे; या पद्धतीने खाल्यास जास्त फायदा फक्त जमिलाच नाही तर तिची आठ वर्षांची मुलगी तात्यानालासुद्धा हा आजार आहे. त्यामुळे तिच्या भविष्याची चिंता आता जमिलाला आहे. पण उलट तिनेच आपल्या आईला आत्मविश्वास मिळवून दिला.  जमीला सांगते, तिनेसुद्धा लोक आपल्याकडे पाहत राहत असल्याचं नोटिस केलं. पण कोण काय विचार करतं, याची तिने पर्वा केली नाही. शाळा सुटल्यानंतर मला जोरात आवाज देत ती धावत येत मला मिठी मारते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या