covisheild लशीचा सर्वात आव्हानात्मक अशी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती ICMR आणि सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियानं (serum institute of india) दिली आहे.
अमेरिका आणि रशियाने आपल्या कोरोना लशीच्या (corona vaccine) तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची सुरुवातीचा निकाल जारी केला. या लशी 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचा दावा संबंधित औषध कंपन्यांनी केला. दरम्यान आता भारतातूनही खूशखबर मिळते आहे.
भारतात सुरू असलेल्या ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलची नोंदणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं दिली आहे.
कोव्हिशिल्ड (covisheild) लशीनं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमधील महत्त्वपूर्ण अशी प्रक्रिया पार केली आहे. त्यामुळे लवकरच ही लस मिळण्याची आशा आहे.
अॅस्ट्रेझेनका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं तयार केलेली ही लस. यामध्ये भारतातील पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची (Serum Institute of India) भागीदारी आहे.
सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांनी पुढील वर्षात जानेवारीतच कोरोना लस येईल अशी शक्यता वर्तवली आहे. तसंच यूकेतील ट्रायलच्या परिणामांनुसार या लशीच्या आपात्कालीन वापराच्या मंजुरीसाठीही अर्ज केला जाण्याची शक्यता आहे.
ऑक्सफोर्डची कोरोना लस प्रभावी आणि सुरक्षित ठरली तर सीरम इन्स्टि्युट या लशीचे 100 कोटी डोस तयार करणार आहेत. त्यातील 50 टक्के भारतासाठी आणि 50 टक्के गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना पुरवले जातील.