कोरोना काळात(Corona Pandemic)रुग्णांच्या सेवेसाठी ‘Miss Englan’चा मुकूट काढून ठेवणारी डॉ.भाषा मुखर्जी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
2019 साली डॉ. भाषा मुखर्जी यांनी मिस इग्लंड हा किताब जिंकला होता. मात्र कोरोना काळात रुग्णांच्या सेवेला महत्व देत त्या कामावर परतल्या. आता युरो कपमुळे खेळांडूंबरोबर त्यांचीही चर्चा सुरू आहे. डॉ. भाषा यांनी टिम इग्लंडच्या सपोर्टसाठी सोशल मीडियवार आपला फोटो शेअर करताच तो व्हायल झाला.
त्यांनी इग्लंडचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन पोज देते फोटो काढला आहे. भारतीय वंशांच्या डॉ. भाषा मुखर्जी ब्रिटीश नागरीक आहेत. 2019 मध्ये त्यांनी मिस इग्लंड हा किताब जिंकला.
परदेश दौऱ्यावर असताना त्यांना एका चॅरेटीसाठी ऍम्बेसिडर बनवण्याकरता भारतात निमंत्रीत करण्यात आलं होतं. त्याचवेळी कोरोनाने रौद्ररूप धारण केलं होत. तेव्हा भाषा यांनी रुग्णांच्या सेवेसाठी इग्लंडला परतण्याचा निर्णय घेतला.
तेव्हा त्या कोलकतामध्ये एका क्लबबरोबर काम करत होत्या. त्यावेळी पिलग्रिम रुग्णालयाकडून एक मेसेज आला. कोरोना काळात रुग्णालयातील स्टाफ अडचणीत असल्याचं कळताचं त्यांनी परत जायचं ठरवलं.
कोरोना काळात केवळ मुकूट घालून फिरण्यापेक्षा देशाची सेवा करायला हवी असं त्यांच मत होतं. डॉ.भाषा यांनी रुग्णालयाच्या मॅनेजमेंटबरोबर संपर्क करत कामावर परतण्याचा निर्णय कळवला.