JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / आठवडाभरापेक्षा जास्त दिवस Nipples ला खाज; गंभीर आणि दुर्मिळ आजाराचं लक्षण

आठवडाभरापेक्षा जास्त दिवस Nipples ला खाज; गंभीर आणि दुर्मिळ आजाराचं लक्षण

ब्रेस्ट (Breast) किंवा निपल्सला (Nipples) खाज येते म्हणून त्यावर घरगुती उपचार करून ही खाज जात नसेल, तर मात्र चिंतेचं कारण आहे. डॉक्टरांना जरूर दाखवा.

0108

अ‍ॅलर्जी हे खाजेचं सर्वसामान्य असं कारण आहे. तुम्ही अंघोळीसाठी वापरत असलेला साबण, कपड्यांसाठी वापरत असलेला डिटर्जंट, सौंदर्यप्रसाधनं किंवा कपडे यामुळे तुम्हाला अ‍ॅलर्जी झाली असण्याची शक्यता आहे.

जाहिरात
0208

अनेकदा ब्रेस्टमध्ये सौम्य असा ट्युमर असतो, जो कॅन्सरचा नसतो. यामुळेदेखील निपल्सला खाज येते.

जाहिरात
0308

तुम्हाला एक्झेमा असेल, तर निपल्स आणि त्याच्याभोवताली पुरळ येतात.  डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर उपचार करा.

जाहिरात
0408

रजोनिवृत्ती येण्याच्या काळात त्वचा पातळ आणि कोरडी होते. हार्मोन्समध्ये बदल होत असतात. तुमचं शरीर मॉईश्चर गमावत असतं आणि त्यामुळे व्हजायना, निपल्स अशा शरीराच्या कोणत्याही भागावर खाज येते.

जाहिरात
0508

तारुण्यात पदार्पण, प्रेग्नन्सी, मासिक पाळी यावेळी हार्मोन्समध्ये बदल होतात. यावेळी स्तनांची वाढ होते, त्यावेळी स्तनांना खाज येते. वजन वाढल्यासही ही समस्या उद्भवते.

जाहिरात
0608

हवामान थंड आणि कोरडं असेल तर त्यामुळे शरीराला खाज येते. अगदी ब्रेस्ट आणि निपल्सदेखील. अशावेळी अंघोळ किंवा शॉवर 10 मिनिटांत आटोपावं. कोमट पाणी वापरावं कारण गरम पाण्यामुळे त्वचा अधिक कोरडी होते.

जाहिरात
0708

उन्हाळ्यात किंवा जास्त तापमानात राहिल्यास हिट रॅशची समस्या उद्भवते. यावेळी ब्रेस्टवर छोटे छोटे पुरळ येतात आणि त्यांना खाज येते.

जाहिरात
0808

ब्रेस्टला खाज येणं हे ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तज्ज्ञांच्या मते, इन्फ्लमेटरी ब्रेस्ट कॅन्सर (inflammatory breast cancer) या दुर्मिळ ब्रेस्ट कॅन्सरचं हे लक्षण आहे. या कॅन्सरमध्ये ब्रेस्टला खाज येण्यासह ब्रेस्टला सूजदेखील येते, शिवाय ब्रेस्ट उबदार वाटतात. जर निपल्स आणि त्याच्या आजूबाजूला खाज येत असेल, तर हेदेखील Pagets’s disease या दुर्मिळ ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या