भारतीय संस्कृतीमध्ये मेंदीला खूप महत्त्व आहे. लग्न, सणसमारंभला भारतीय महिला मेंदी लावून नटतात. मेंदीचा विविध आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. मात्र सध्या मेंदी वेगळ्या कारणामुळं चर्चेत आहेत. पाहा PHOTO
गरोदर महिला अनेकवेळा आपल्या प्रेग्नन्सी दरम्यान फोटोशूट करतात. प्रेग्नन्सी फोटो शूट हा भारतातही ट्रेंडिंग विषय आहे. पण त्या प्रेग्नन्सी फोटो शूटचे हे फोटो पाहून तुम्ही काय म्हणाल? मेंदीचा असा वापर कधी पाहिलाय का? (फोटो Instagram henna_by_kelly_caroline)
प्रेग्नन्सी फोटोशूटमधला नवा ट्रेंड आहे पोटावर मेंदीचं डिझाईन काढायचा. (फोटो Instagram henna_by_kelly_caroline)
प्रेग्नन्सीमध्ये तरुणींना आपल्या या आनंदाच्या आणि आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांचे फोटो ठेवायला आवडतं. त्यामुळे या महिला अशा पद्धतीने आपल्या बेबी बम्पवर मेंदीनी डिझाइन तयार करून याचे फोटो शेअर करतात. फोटो (Instagram thehennaqueen)
कितवा महिना आहे, ते पाहून पोटाच्या आकारानुसार ही मेंदीची डिझाइन्स काढण्यात आली आहेत. ( फोटो Instagram henna_by_kelly_caroline
अनेकदा काही मेंदीमध्ये अधिक रंग चढण्यासाठी केमिकल मिक्स केलं जातं. त्यामुळे शरीराला ते घातक असतं. प्रेग्नन्सीत असं घडलं तर मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे असं करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने बेबी बम्पवर मेंदी लावण्याआधी दहा वेळा विचार करा. (Instagram henna_by_kelly_caroline)