JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / उपवासासाठी शेंगदाणे खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शेंगदाण्यांमुळे वाढतो Cancer चा धोका

उपवासासाठी शेंगदाणे खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शेंगदाण्यांमुळे वाढतो Cancer चा धोका

Peanuts Cause of Cancer: श्रावण महिना सुरू आहे, उपवासांना सुरुवात झाली आहे. त्यातच हे नवं संशोधन समोर आलं आहे.

019

शेंगदाणे आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानले जातात. ड्रायफ्रूट इतकेच शेंगदाणे खाणं देखील फायदेशीर आहेत. मात्र, एकाच संशोधनाने धक्कादायक माहिती समोर आलीये. या संशोधनानुसार शेंगदाणे जास्त प्रमाणात खाल्याने कॅन्सर होऊ शकतो.

जाहिरात
029

कार्सिनोजेनेसिस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार कॅन्सरच्या रुग्णांमध्ये असलेलं प्रोटीन शेंगदाण्यांपासून आल्याचं सिद्ध झालं आहे. या प्रोटीनला पीनट अ‍ॅग्लुटीन म्हटलं जातं. हे प्रोटीन दोन प्रकारचं मॉलिक्युल्स निर्माण करतात. यामुळे कॅन्सर पसरण्याची शक्यता वाढते.

जाहिरात
039

पीएनए मधून निघणारे 2 मोलिक्युल्स सायटोकाईन्स असतात. हे छोटे प्रोटीन पेशींना सिग्नल देण्याची क्रिया आणि शरीरामधून इम्युन रिस्पॉन्स देण्याच्या क्रियेला कमी करतात. त्यामुळे कॅन्सर वाढू शकतो.

जाहिरात
049

IL 6 आणि MCP 1 या प्रोटीन्सबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. हा रक्त वहन करणाऱ्या पेशींच्या आतल्या भागांमध्ये अ‍ॅडोथेलियल पेशीना चिकटणारा पदार्थ आहे. हा वाढल्यामुळे पेशींमध्ये ट्युमर सेल्स वाढायला लागतात.

जाहिरात
059

युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हर पूलचे प्रोसेसर आणि या संशोधनाच्या लेखकांनी ही धक्कादायक माहिती असल्याचे म्हटलं आहे. त्यांच्या मते कॅन्सरचे रुग्ण पौष्टिक पदार्थ म्हणून शेंगदाणे जास्त प्रमाणात खात असतील तर, त्यामुळे हा आजार जास्त वाढू शकतो. याशिवाय अतिप्रमाणात शेंगदाणे खाल्ल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.

जाहिरात
069

PNA हा कार्बोहायड्रेट बाइंडिंग प्रोटीन आहे. शेंगदाणे खाल्ल्यानंतर हा प्रोटीन रक्तामध्ये वेगाने पसरतो. PNAला पचवणं कठीण असतं. प्रत्येक शेंगदाण्यांमध्ये त्याच्या वजनाच्या 0.15 टक्के PNA असतो.

जाहिरात
079

शेंगदाणे जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरामध्ये PNAचं प्रमाण वाढायला लागतं. PNA मुळे शरीरामध्ये ट्युमर सेल्स एका ठिकाणी जमायला सुरुवात होते. त्यामुळे कॅन्सर वाढण्याची शक्यता असते.

जाहिरात
089

यामुळे कॅन्सर टाळायचा असेल तर दिवसभरामध्ये केवळ 28 ग्राम शेंगदाणे खावेत. असा सल्ला दिला जातोय. ज्या लोकांना अतिप्रमाणामध्ये शेंगदाणे खायची सवय आहे. त्यांना कॅन्सर होण्याची भीती जास्त असते.

जाहिरात
099

शेंगांमध्ये असलेल्या PNA मुळे कॅन्सर वाढत असला तरी अशा प्रकारच्या कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याच्या घटना अद्याप समोर आलेल्या नाहीत. शिवाय पुरुषांमध्ये होणाऱ्या प्रोटेस्ट कॅन्सरवर शेंगदाणे खाण्याचा कोणताही परिणाम होत नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या