JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / भारतात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या खतरनाक स्ट्रेनवर कोरोना लस प्रभावी आहे का?

भारतात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या खतरनाक स्ट्रेनवर कोरोना लस प्रभावी आहे का?

कोरोनाचा नवा स्ट्रेन (Corona variant) डेल्टा स्ट्रेनइतकात घातक असल्याचं सांगितलं जातं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 08 जून : गेल्या आठवड्यातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतातील केवळ एकच डेल्टा (Covid-19 Delta) हा कोविड-19 चा स्ट्रेन धोकादायक असल्याचं म्हटलं होतं. देशात आढळलेले इतर दोन स्ट्रेन (Corona strain) तितके काळजी करण्यासारखे नसल्याचं संघटनेने स्पष्ट केलं होते. मात्र आता कोरोनाचा नवा स्ट्रेन (Corona variant) समोर आला आहे. जो या डेल्टा स्ट्रेनइतकात घातक असल्याचं सांगितलं जातं आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था अर्थात एनआयव्हीनं (National Institute of Virology) कोरोनाच्या एका नवीन स्ट्रेनचा शोध लावला आहे. B.1.1.28.2 असं या व्हेरिएंटचे नाव आहे. यूके (United Kingdom) आणि ब्राझीलहून आलेल्या प्रवाशांच्या नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग केल्यानंतर हा नवा व्हेरिएंट सापडला आहे. हे वाचा -  डेल्टानंतर भारतात आणखी एक भयंकर कोरोना; पुण्यात सापडला सर्वात घातक स्ट्रेन या नवीन व्हेरिएंटची लागण झाल्यास वजन कमी होणं, श्वसनमार्गामध्ये विषाणूची दुसरी प्रतिकृती तयार होणं, फुफ्फुसात जखमा होत असल्याचं समोर आलं आहे. या व्हेरिएंटचे सीरियाच्या उंदरांवर (Syrian hamster model) बरेच प्रतिकूल परिणाम दिसून आले आहेत. या व्हेरिएंटमुळे कोरोनाची गंभीर लक्षणं उद्भवत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आता यावर सध्या अस्तित्वात असलेली कोरोना लस किती परिणामकार आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. हे वाचा -  खासगी रुग्णालयात Corona vaccine घेणार आहात; इथं पाहा कोरोना लशीचे नवे दर बायोआरएक्सआयव्ही (bioRxiv) या वेबसाइटवर या व्हेरिएंटचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संशोधनाच्या अहवालात आजाराची वाढती गंभीरता आणि लशीची परिणाकारकता तपासण्याची आवश्यकता याबाबत माहिती देण्यात आली आहे. एनआयव्ही पुण्याच्या एका अभ्यासानुसार कोव्हॅक्सिन (Covaxin) ही लस विषाणूच्या या व्हेरिएंटवर प्रभावी आहे. तसंच कोव्हॅक्सिनच्या दोन डोसनंतर ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्या या व्हेरिएंटला नष्ट करण्यास सक्षम आहेत, असंही या अभ्यासात म्हटलं आहे. या अभ्यासात SARS-CoV-2 च्या जीनोमवर लक्ष ठेवण्याच्या गरजेवर जोर देण्यात आला आहे. जेणेकरून इम्‍युन सिस्‍टमपासून निसटणाऱ्या व्हेरिएंटसाठी तयारी करता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या