JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / प्रेग्नेन्सीतही मॉर्निंग होईल गूड; Morning Sickness असा करा दूर

प्रेग्नेन्सीतही मॉर्निंग होईल गूड; Morning Sickness असा करा दूर

बर्‍याच महिलांना प्रेग्न्सीत सकाळी उलट्या होतात, घाबरल्यासारखं वाटतं, चक्कर येते, त्याला मॉर्निंग सिकनेस (Morning Sickness) म्हणतात.

0110

गर्भवती महिलेच्या शरीरात अनेक बदल होतात. एस्ट्रोन आणि प्रोजेस्टेरॉनमध्ये वाढ झाल्याने खूप उलट्या होतात. बर्‍याच महिलांना सकाळी उलट्या होतात आणि घाबरल्यासारखं वाटतं. त्याला मॉर्निंग सिकनेस म्हणतात. शरीरात होत असलेल्या बदलांचा केवळ शारीरिक परिणाम होत नाही तर त्याचा मानसिक परिणामही होतो. यापैकी आणखी एक त्रास म्हणजे चक्कर येणं.

जाहिरात
0210

गर्भधारणेच्या काळात होणारी ही एक साधी समस्या आहे मात्र ती खूप त्रासदायकही ठरू शकते. काळजी घेतली गेली तर मोठा अपघात होऊ शकतो आणि गर्भाचंही नुकसान होऊ शकतं.

जाहिरात
0310

पहिल्या 3 महिन्यांनंतर बाळ आकाराने वाढू लागतं आणि गर्भाशयाच्या आणि आजूबाजूच्या नसावर दबाव वाढू लागतो. यामुळे बर्‍याच वेळा चक्कर येण्याची तक्रार महिला करतात.

जाहिरात
0410

याशिवाय काही वेळा प्रेग्नन्सीतील डायबिटीज, अॅनिमिया आणि शरीरात पाण्याचा अभाव यामुळेही चक्कर येण्याचा त्रास होतो.

जाहिरात
0510

चक्कर येत असताना आधी खिडक्या आणि दरवाजे उघडा म्हणजे ताजी हवा येत राहिल. हळूहळू खाली बसून डोकं गुडघ्यांमध्ये ठेवा.

जाहिरात
0610

अचानक उठू नका. शक्य असल्यास डाव्या कुशीवर झोपा. यामुळे मेंदूत रक्तप्रवाह सुधारेल आणि बरं वाटेल.

जाहिरात
0710

जास्त वेळ उभं राहू नका किंवा बसू नका. थोड्या वेळाने एका जागेवरून उठून चाला म्हणजे शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित होईल आणि चक्कर येणार नाही. एकदम उठू नका यामुळे डोकं गरगरतं.

जाहिरात
0810

एनर्जी वाढवण्यासाठी लाईट स्नॅक किंवा फळं खा. थोड्या थोड्या वेळाने केळी किंवा हलकं स्नॅक्स खा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी योग्य राहिल.

जाहिरात
0910

चक्कर येत असताना गरम पाण्याने आंघोळ करू नका. त्यामुळे त्रास होऊ शकतो.

जाहिरात
1010

कायम सैल कपडे घाला म्हणजे शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित राहिल. भरपूर पाणी प्या, ज्यूस,नारळपाणी,लिंबूपाणी घेऊ शकता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या