Monsoon Tips: जर तुम्ही पावसाळ्यात घराबाहेर जात असाल तर या चार गोष्टी सोबत घ्यायला विसरू नका, नाहीतर अडचणीत येऊ शकता.
पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू. पावसाळ्यात वातावरण खूप आल्हाददायक असतं. परंतु पावसाळा जितका आनंद देतो, तितक्याच अडचणीही घेऊन येतो.
वाहतूक कोंडी, चिखल, पाणी तुंबणं इ. अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळं पावसाळ्यात घराबाहेर पडताना काही गोष्टी आपल्या सोबत ठेवाव्यात.
आजकाल प्रत्येकजण मोबाईल वापरतो. अशा परिस्थितीत पाउच नसल्यास पावसाचे पाणी त्यात शिरल्याने तो खराब होऊ शकतो.
छत्री- पावसाळ्यामध्ये पाऊस कधी पडेल, हे सांगता येत नाही. तुम्ही घराबाहेर पडला आणि अचानक पाऊस सुरु झाला, तर तुम्हाला नाहक त्रासाला सामोरं जावं लागू शकते.
या परिस्थितीत तुम्ही छत्री सोबत ठेवावी. छत्री सोबत नेण्यास सोपी असते आणि ती पावसापासून तुमचं आणि तुमच्या सामानाचं संरक्षण करण्यास मदत करते.
रेनकोट- तुम्ही किंवा तुमची मुलं घराबाहेर जात असाल तर तुम्ही तुमच्यासोबत रेनकोट ठेवू शकता. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा तुम्ही भिजण्यापासून वाचू शकता.
पाऊस सुरु झाल्यास तुम्ही तो परिधान करू शकता. याने तुम्ही भिजणार नाही आणि तो सोबत बाळगणंही सोपं असतं.
कोरडे कपडे- तुम्ही ऑफिस, कॉलेज, इंटरव्ह्यू किंवा इतर ठिकाणी जात असाल तर तुमच्यासोबत कोरड्या कपड्यांचा जोडही ठेवू शकता.