JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पुरुषांवर आता नाही चालणार I Love You ची जादू, या तीन शब्दांनी लगेच होतात खूश!

पुरुषांवर आता नाही चालणार I Love You ची जादू, या तीन शब्दांनी लगेच होतात खूश!

महिलांना (Women) खूश ठेवणं खरं तर फारसं अवघड नाही. एखाद्या पुरुषाने तिचा हात धरला आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हटलं तर त्या स्त्रीला आकाश ठेंगणं होईल. प्रत्येक स्त्रीला तिच्या पार्टनरने आपल्याला आय लव्ह यू (I love you.) म्हणावं असं वाटत असतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 सप्टेंबर : महिलांना (Women) खूश ठेवणं खरं तर फारसं अवघड नाही. एखाद्या पुरुषाने तिचा हात धरला आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हटलं तर त्या स्त्रीला आकाश ठेंगणं होईल. प्रत्येक स्त्रीला तिच्या पार्टनरने आपल्याला आय लव्ह यू (I love you.) म्हणावं असं वाटत असतं. हे तीन जादुई शब्द (Magic Words) उच्चारल्यावर कोणतीही स्त्री नक्कीच पाघळेल. पण हे जादुई शब्द पुरुषांनाही तेवढेच आकर्षित करतील का? पुरुषांना (Men) आय लव्ह यू म्हणून आपण खूश करू असं त्याच्या पार्टनरला वाटत असेल. पण आता तसं नाही. पुरुषाला आय लव्ह यूपेक्षाही दुसरे काही शब्द आवडत असल्याचं एका सर्वेक्षणात (survey) दिसून आलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आय लव्ह यू पेक्षाही असे ते कोणते शब्द असतील? पण हे खरं आहे. या तीन शब्दांऐवजी दुसरे काहीतरी ऐकून पुरूष अधिक आनंदी होतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्वात प्रभावी वाक्य म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे. यातून प्रेमाची हमी अनुभवता येते. पण कदाचित पुरुषांना असं वाटत नाही. या तीन शब्दांऐवजी दुसरं काहीतरी ऐकून पुरूष अधिक खूश होतात. डेली स्टार (Daily Star) ने त्यांच्या गेसबुक युर्जसला एक प्रश्न विचारला होता. पुरुषांना सर्वात जास्त ऐकायला आवडणारे तीन शब्द कोणते आहेत? या प्रश्नाला शेकडो लोकांनी प्रतिसाद दिला. या प्रश्नाचं उत्तर आय लव्ह यू असेल असंच बहुतांशी जणांना वाटलं असेल. पण तसं नाही. या तीन शब्दांपेक्षा दुसऱ्याच शब्दांमुळे पुरूष आनंदी होत असल्याचं यामधून दिसून आलं. यापैकी बहुतांशी लोकांनी ‘रात्रीचं जेवण तयार (आहे)’ हे शब्द ऐकल्यावर आपण खूश होत असल्याचं सागितलं. मी तुझ्यावर प्रेम करतो त्यापेक्षा जास्त पुरुषांना त्यांच्या जोडीदाराच्या तोंडातून जेवणाबाबत निघालेले हे शब्द आवडतात. या व्यतिरिक्त आपला पार्टनर जेवणासाठी कुठला पदार्थ तयार करत आहे हे पुरुषांना सांगतो तेव्हाही पुरूषांना फार आवडतं. पुरुषाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, हे डेली स्टारने केलेल्या या सर्वेक्षणाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. जेवणाबाबत या दोन ओळी वगळता पुरुषांनी आणखी बरीच मजेदार उत्तरे दिली. यामध्ये बिअर हवी आहे, वडील घरात नाहीत, घटस्फोट आदी शब्दही आवडत असल्याचं अनेक पुरूषांनी सांगितलं. थोडक्यात काय तर आय लव्ह यू या शब्दांची जादू आता पुरूषांना भुरळ पाडणार नाही. तर पार्टनरने आपली पाककला दाखवली तर पुरूष नक्कीच पाघळतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या