JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / कधी प्यायला आहे तमालपत्राचा काढा? कोणत्याही वेदनेत त्वरित मिळतो आराम

कधी प्यायला आहे तमालपत्राचा काढा? कोणत्याही वेदनेत त्वरित मिळतो आराम

अंगदुखी, पाठदुखी, डोकंदुखी सारख्या आजारात औषधांआधी तमालपत्राचा काढा (Bay Leaf Decoction) घेऊन पाहा. बनवण्याची पद्धत अतिशय सोपी (Easy to Make) आहे.

0108

प्रत्येक मसाल्याच्या पदार्थांची स्वत:ची खासीयत असते. तशीच जेवणात वापरल्या जाणाऱ्या तमालपत्राचेही खास गुण आहे. तमालपत्राने जेवणाची चव तर,वाढतेच शिवाय औषधी गुणधर्म असल्याने याचा वापर अनेक प्रकारे केला जातो.

जाहिरात
0208

तमालपत्रामध्ये कॉपर,पोटॅशियम, कॅल्शियम,मॅग्नीशियम,सेलेनियम आणि आयर्न यांचा भरपूर साठा असतो. तर, ऍटीऑक्सीडेंट्स असल्याने कॅन्सर,ब्लड क्लॉटिंग सारख्या हृदयाशी संबंधीत आजारांनाही दूर करतं. तमालपत्रांचा वापर करुन त्याचा काढा बनवल्यास बरेच पोषक घटक मिळतात.

जाहिरात
0308

शरीरात कणकण जाणवत असेल, थंडीने वेदना होत असतील तर, तमालपत्राचा काढा घेतला पाहिजे. यामुळे दुखण्यात आराम मिळतो.

जाहिरात
0408

डोक्यात तीव्र वेदना होत असतील तर, तमालपत्रांचा काढा बनवून प्या. डोकेदुखीमध्ये आपल्याला त्वरित आराम मिळेल.

जाहिरात
0508

दुखापत झाली असेल किंवा हात किंवा पाय मुरगळला असेल तर, तमालपत्राचा काढा प्यायला हवा. यामुळे सूज आणि वेदना कमी होईल. त्वरीत आरामासाठी तमालपत्र बारीक करून मुरगळलेल्या जागेवर लावा, आराम मिळेल.

जाहिरात
0608

बर्‍याच वेळा, झोपेत शिरा ताणल्या जातात किंवा क्रॅम्प येतो. त्यामुळे शिरांवर सूज येत. अशा परिस्थितीत तमालपत्राचा काढा बनवून त्याचं सेवन करावं. त्वरित बरं वाटेल.

जाहिरात
0708

पाठीच्या दुखण्यात तमालपत्राचा काढा बनवावा आणि दिवसातून कमीतकमी 2 वेळा सेवन करावा. त्वरित आरामासाठी, तमालपत्र मोहरीच्या तेलात उकळवा आणि हे तेल लावा दुखणाऱ्या जागेवर लावा.

जाहिरात
0808

तमालपत्राचा काढा बनवण्यासाठी 4 तमालपत्र,अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा बडीसोप यांची पावडर करून घ्या. हे मिश्रण 1 लिटर पाण्यात चांगलं उकळून घ्या. पाणी अर्ध झाल्यावर गॅस बंद करा. पाच मिनिटं तसच झाकून ठेवा. थोड्या वेळाने आपल्या आवडीनुसार काळं मीठ किंवा मध घालून प्या.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या