वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे सेनापती मंगळ 26 फेब्रुवारी 2022 रोजी मकर राशीत प्रवेश करत आहेत. या राशीत शनिदेव आधीच विराजमान आहेत. मंगळ राशीचा बदल ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचा मानला जातो. शनि आणि मंगळ यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे, त्यामुळे मकर राशीतील या दोन ग्रहांच्या संयोगाने काही राशींच्या लोकांसाठी समस्या निर्माण होऊ शकतात.
कर्क - मंगळ आणि शनि तुमच्या राशीच्या सातव्या घरात एकत्र येतील. सातवे घर भागीदारी आणि वैवाहिक जीवनाचे घर आहे. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. भागीदारीच्या कामात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या दरम्यान, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद घालणे टाळा. मंगळ संक्रमणाच्या काळात कोणतेही नवीन काम सुरू करू नका.
सिंह- मंगळ संक्रमण काळ असल्यानं तुम्ही नसत्या वादात अडकाल. शनि आणि मंगळाचा संयोग तुमच्या सहाव्या घरात असेल, ज्याला शत्रूचे घर असेही म्हणतात. या काळात गुप्त शत्रूंकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो.
कन्या - कन्या रास असलेल्या लोकांच्या करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. तुमच्या राशीच्या पाचव्या घरात शनि आणि मंगळाची जोडी असेल. या काळात तुम्हाला मुलांशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो.
धनु- धनु राशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या दरम्यान तुम्ही तुमच्या बोलण्यावर संयम ठेवावा. तुमच्या राशीच्या तिसर्या घरात शनि आणि मंगळाची जोडी असेल, या काळात तुम्ही कोणत्याही प्रकारे नवीन डील फायनल करू नका. विरोधक तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतील.