नवविवाहित दाम्पत्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात होते ती हनीमूनपासून (honeymoon). त्यामुळे लग्नाआधीपासूनच हनीमूनचं ठिकाण निश्चित केलं जातं. पण या ठिकाणांचा जोडप्यांच्या संसारावर परिणाम होतो, असं अभ्यासात दिसून आलं आहे.
नवविवाहित दाम्पत्याच्या नव्या संसाराची सुरुवात होते ती हनीमूननं. लग्नानंतर नाही तर लग्नाआधीपासूनच काही जोडपी आपली हनीमूनचं ठिकाण ठरवून ठेवतात. त्यामध्ये काही अशी मोजकी ठिकाणं आहेत, ज्याला सर्वाधिक पसंती दिली जाते. अशाच काही ठिकाणांचा कंपेर बेटनं अभ्यास केला. त्यावेळी काही हनीमून डेस्टिनेशन ही घटस्फोटासाठी कारणीभूत ठरू शकतात, असं दिसून आलं आहे. (pic credit: pexels/Asad Photo Maldives)
हनीमूननंतर आपल्या जोडीदारापासून वेगळे झालेल्या आणि घटस्फोट घेतलेल्या 3,100 लोकांवर हा अभ्यास करण्यात आला आहे. आकडेवारीनुसार ज्या देशांमध्ये हनीमून केल्यानंतर लवकरच विवाहित जोडप्यांवर घटस्फोटाची वेळ आली आहे अशा देशांच्या यादीमध्ये मालदीव पहिल्या स्थानावर आहे. 3100 लोकांपैकी 620 म्हणजे 20 टक्के घटस्फोट घेतलेले लोक असे आहेत ज्यांनी मालदीवमध्ये हनीमूनचा आनंद लुटला होता.
मालदीवनंतर मोरोक्कोचे मॅरॅकेश हे दुसरं शहर आहे जिथं हनीमूननंतर 527 (17 टक्के) लोकांनी घटस्फोट घेतला आहे. त्याच वेळी बोरा-बोरा हनीमून डेस्टिनेशन तिसऱ्या क्रमांकावर आहे, जेथे हनीमून झालेल्यांचा घटस्फोटाचा आकडा 13 टक्के आहे.
सन यूकेमधील रिपोर्टनुसार थायलंड, कॅनकम आणि बँकॉक ही सेफ हनीमून डेस्टिनेशन आहेत. कॅलिफोर्नियामधील नापा व्हॅली आणि बँकॉक ही ठिकाणं विवाहित जोडप्यांसाठी सेफ हनीमून डेस्टिनेशन्सच्या यादीत सर्वांत वर आहेत. नापा आणि बँकॉकमध्ये हनीमूनला जाणाऱ्या फक्त एक टक्का लोकांनी नंतर घटस्फोट घेतला आहे. याचसोबत मॅक्सिसोमधील कॅनकम शहरात हनीमून झालेल्यांमध्ये हा आकडा केवळ तीन टक्के आहे. कॅनकम हे जगातील प्रसिद्ध हनीमून डेस्टिनेशन आहे.
अभ्यासानुसार आपण हनीमूनसाठी ब्रिटनला जाऊ शकता कारण या 15 हनीमून डेस्टिनेशन्सच्या यादीमध्ये ब्रिटनमधील एकही हनीमूनचे स्पॉट समाविष्ट नाही. त्याचवेळी युरोपियन देशांमध्ये हनीमून केलेल्या लोकांमध्ये ग्रीकच्या सँटोरिनीमधील 5%, रोमच्या वेनिसमधील 5% आणि क्रोएशियाच्या दुब्रोव्हनिकमधील 4% लोकांचा घटस्फोट झाल्याची नोंद आहे. आता नवीन ट्रेंडनुसार लोक आपल्या जोडीदाराशिवाय हॉलिडेवर जातात ज्याला सोलोमून्स म्हणतात. हॉलिडे डेस्टिनेशन्सला त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.