Maharashtra Lockdown Rules Revised : राज्यात तुमच्यासाठी काय सुरू राहणार आणि काय नाही पाहा एका क्लिकवर
राज्यात 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन लागू आहे. 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत रात्री 11.59 वाजेपर्यंत कडक निर्बंध असतील.
रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी. अन्य वेळातही जमावबंदी आदेश लागू. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यावर निर्बंध
बिग बझार, मॉल, रिलान्स असे सुपरमार्केट किंवा मॉल्स सुरू राहणार का? - अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी आस्थापने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहतील. पण जिथं वेगवेगळ्या वस्तू विकल्या जातात ज्या अत्यावश्यक सेवेत येत नाहीत तर अशी आस्थापनं बंद असतील.
विकेंड लॉकडाऊनला APMC मार्केट सुरू असणार का? - हो सुरू असतील. पण जर तिथं कोरोना नियमांचं उल्लंघन होत असेल आणि कोरोना संसर्ग वाढण्याची भीती असेल तर स्थानिक प्रशासन राज्य सरकारच्या परवानगीनुसार एपीएमसी मार्केट बंद करू शकतं.
दारूची दुकानं चालू असणार का? किंवा तिथून होम डिलिव्हरी मिळेल का? - दारूची दुकानं चालू असणार नाहीत. पण तुम्हाला ठरलेल्या कालावधीत तुम्हाला बार किंवा रेस्टॉरंट्समधून दारू विकत घेता येईल किंवा होम डिलिव्हरीही मिळेल.
ढाबा सुरू असेल का? - हो. पण बार आणि रेस्टॉरंट्सना लागू करण्यात आलेल्या नियमांनुसार इथं बसायला मिळणार नाही. तुम्ही इथून पार्सल नेऊ शकता किंवा होम डिलीव्हरी मिळेल.
रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत आणि विकेंडला रेस्टॉरंट्समधून होम पार्सल घेता येणार का? - स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार रेस्टॉरंट्स आणि बार सुरू असतील पण तिथं बसता येणार नाही. पण सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत होम पार्सल घेता येईल. या वेळेव्यतिरिक्त किंवा विकेंडला होम पार्सल नेता येणार नाही. पण स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्या वेळेत होम डिलिव्हरी मिळेल.
एसी, फ्रिज, कुलर, टीव्ही या इलेक्ट्रिक वस्तूंचं रिपेअर शॉप आणि मोबाईल अशा इलेक्ट्रिक वस्तूंचं दुकान सुरू असणार का? - नाही.
गॅरेज, ऑटोमोटिव्ह स्पेअर पार्ट्स शॉप खुली राहणार? - गॅरेज खुली असती पण शॉप बंद असतील. पण जर गॅरेजमध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन होताना दिसलं तर मग ते बंद केले जातील.