ब्रिटनहून (britain) भारतात परतलेले काही प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) असल्याचं निदान झालं आहे. यामध्ये बहुतेक रुग्ण हे महाराष्ट्राशेजारील राज्यात आहेत त्यामुळे महाराष्ट्रावर नव्या कोरोनाचं (new corona strain) संकट घोंगावतं आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर संपूर्ण जग सावध झाला आहे. भारतानंही खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनमधून 22 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 31 डिसेंबरपर्यंत या कालावधीत येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. तसंच विमानतळांवर प्रवाशांची कोविड चाचणी (Covid Test)अनिवार्य करण्यात आली आहे. यावेळी काही लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
महाराष्ट्र - 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत 45 नागरिक ब्रिटनमधून कल्याणमध्ये परतले आहेत. त्यांच्या नावाची यादी राज्य सरकारने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे सुपूर्द केली आहे आणि या सर्वांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नागपुरात इंग्लडहून परत आलेल्या एका तरुणाचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.
गोवा - महाराष्ट्राच्या वेशीवर असलेल्या गोव्यातही ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांपैकी 11 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 9 ते 20 डिसेंबरदरम्यान ब्रिटनवरून 979 प्रवासी भारतात आले होते. त्यापैकी 11 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. सर्व 11 रुग्णांना आरोग्य प्रशासनाने निगराणी खाली ठेवला असून त्यांचे नमुने पुण्याच्या नॅशनल व्हायरालॉजी लॅबकडे पाठवण्यात आले आहेत.
गुजरात - ब्रिटनहून अहमदाबादमध्ये आलेले चार प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये ब्रिटीश नागरिकही आहेत. मंगळवारी सकाळी एअर इंडियाच्या फ्लाइटनं लंडहून हे प्रवासी अहमदाबादमध्ये दाखल झाले. अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. ब्रिटनहून परतलेल्या 275 प्रवाशांची चाचणी झाली, त्यापैकी 271 जण कोरोना निगेटिव्ह आहेत.
मध्य प्रदेश - इंदोरमधील एक नागरिक स्कॉटलंडहून परतला आहे. त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आता त्याला झालेला कोरोना हा ब्रिटनमधील नवा कोरोना आहे का? त्या अहवालाची प्रतीक्षा आबे. इंदोर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
राजस्थान - राजस्थानमध्येही 24 डिसेंबरपर्यंत यूकेहून एकूण 811 प्रवाशी आले आहेत. या प्रवाशांना 7 दिवस होम आयसोलेट करण्याचे निर्देश राज्य सरकारनं स्थानिक प्रशासनानला दिले आहेत. सात दिवसांनंतर त्यांची पुन्हा कोरोना टेस्ट केली जाणार आहे.
पंजाब - एअर इंडियाच्या विमानानं यूकेहून आलेले 7 प्रवाशी आणि क्रू मेंबर्स कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे. त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.