कोवॅक्सिन (Covaxin) या मेड इन इंडिया लशीचा सध्या लसीकरणात समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील हीच लस घेतली.
देशभर आता सर्वसामान्य नागरिकांचं लसीकरण सुरू झालं आहे. यामध्ये मेड इन इंडिया कोरोना लस कोवॅक्सिनही (Covaxin) दिली जाते आहे. हैदराबादमधील भारत बायोटेकनं (Bharat Biotech) तयार केलेली ही लस.
लसीकरण सुरू असतानाच कोवॅक्सिन लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल जारी करण्यात आला आहे. भारत बायोटेकनं याबाबत मोठी माहिती दिली आहे.
ज्यांना कोरोना संसर्ग झालेला नाही. त्यांनी या लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोनापासून संरक्षण देण्यात ही लस 81 टक्के प्रभावी ठरली आहे, असं कंपनीनं सांगितलं आहे.
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सनंतर इतर नागरिकांनाही लस उपलब्ध होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच दिवशी ही लस घेतली आणि नागरिकांनादेखील लस घेण्याचं आवाहन केलं.
आता या मेड इन इंडिया लशीला परदेशातूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. इतर देशांना लशीचा पुरवठा कऱण्यासाठीदेखील आपण प्रयत्नशील असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.