JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / तुमच्या शरीरात Vitamin D ची कमतरता तर नाही ना? काय आहेत लक्षणं पाहा

तुमच्या शरीरात Vitamin D ची कमतरता तर नाही ना? काय आहेत लक्षणं पाहा

शरीरात एखाद्या घटकाची कमी असल्यास शरीर आपल्याला संकेत देतं.

0105

थकवा - तुम्ही योग्य आहार घेत आहात, पुरेशी झोप घेत आहात, तरीदेखील तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर तुमच्या शरीरात 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता असू शकते.

जाहिरात
0205

हाडं आणि स्नायूंमध्ये वेदना - 'व्हिटॅमिन डी' हाडं आणि स्नायूंसाठी आवश्यक असतं, त्यामुळे जर तुमची हाडं आणि स्नायूंमध्ये वेदना होत असतील तर हे 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेचं लक्षण असू शकतं.

जाहिरात
0305

जखम उशिराने भरणं - तुम्हाला जखम झाली आणि ती बरी होण्यास खूप वेळ लागत असेल, तर हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं.

जाहिरात
0405

मूडमध्ये बदल - महिलांमध्ये 'व्हिटॅमिन डी'चा अभाव असेल, तर त्यामुळे तणाव उद्भवतो. महिलांच्या मूडमध्ये बदल होत राहतो, त्यांच्यामध्ये उदासीनता, निराशा येते.

जाहिरात
0505

केस गळणं - केस गळण्यावर तुम्ही भरपूर उपचार केलेत, मात्र फरक पडत नाही. तुमचे केस भरपूर प्रमाणात गळत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हेदेखील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचं एक लक्षण आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या