JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Valetine's Day : सचिन-सारा यांच्या हिंदू-मुस्लीम लव्ह स्टोरीला वडील अब्दुल्लांचा होता विरोध

Valetine's Day : सचिन-सारा यांच्या हिंदू-मुस्लीम लव्ह स्टोरीला वडील अब्दुल्लांचा होता विरोध

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश पायलट यांचे पुत्र सचिन पायलट आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सारा यांच्या प्रेमकहाणीत धर्माची भिंत आड येत होती. ती त्यांनी यशस्वीपणे पाडली… त्यांची ही Love Story खास व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने….

0112

राजस्थानचे उपमुख्यमंत्री झालेले काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी माहिती असेल, पण त्यांची ही लव्ह स्टोरी माहीत आहे का?

जाहिरात
0212

काश्मीरपासून सुरू झालेलं त्यांचं प्रेम हिंदू- मुस्लीम भिंतीमुळे अडकलं. राजकीय कारकिर्दीइतकंच सचिन पायलट यांची लव्हस्टोरीदेखील तितकीच रंजक आहे.

जाहिरात
0312

काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांना सार्वजनिक जीवनात सगळे लोक ओळखतात. पण काँग्रेसच्या या तरुण नेत्याचं आयुष्य एखाद्या सिनेमासारखंच आहे.त्यांच्या कहाणीची नायिका आहे सारा पायलट. या दोघांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे.

जाहिरात
0412

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश पायलटचे पुत्र सचिन पायलट आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सारा यांच्या प्रेमकहाणीत धर्माची भिंत आड येत होती. ती या प्रेमींनी प्रेमानं पाडली.

जाहिरात
0512

सचिन आणि साराची पहिली नजरा नजर परदेशात शिकत असताना झाली. काश्मीरची सौंदर्यवती साराला पाहून सचिन पायलट प्रेमातच पडले.

जाहिरात
0612

शिक्षण पूर्ण करून सचिन परत दिल्लीत आले आणि सारा तिथेच इंग्लंडला राहिल्या. पण फोनवर दोघं तासनतास बोलायचे आणि सरते शेवटी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

जाहिरात
0712

भले दोघांचं घराण राजकारणात होतं, पण धर्माची भिंत दोघांच्या मधे आली. दोघांचं कुटुंब या लग्नाला अजिबात तयार नव्हतं.

जाहिरात
0812

अखेर 2004मध्ये सचिन आणि सारा यांनी लग्न केलं. पण या लग्नाला साराचे वडील फारुख अब्दुल्ला उपस्थित राहिले नाहीत.

जाहिरात
0912

लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी साराच्या घरातल्यांनी सचिन यांना जावई म्हणून स्वीकारलं.

जाहिरात
1012

सचिन आणि सारा यांना दोन मुलं आहेत. सारा एक एनजीओ चालवतात.

जाहिरात
1112

सारा आणि सचिन देशातल्या सर्वात सुंदर जोड्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात.

जाहिरात
1212

सारा काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची बहीण.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या