JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Dangerous dog : कितीही क्युट वाटले तरी पाळू नका; Pitbul सारखेच मालकाचाही जीव घेतात हे जगातील सर्वात 10 खतरनाक श्वान

Dangerous dog : कितीही क्युट वाटले तरी पाळू नका; Pitbul सारखेच मालकाचाही जीव घेतात हे जगातील सर्वात 10 खतरनाक श्वान

पिटबुलसह जगभरात अशा कुत्र्यांच्या 10 प्रजाती आहेत ज्यांना पाळणं म्हणजे तुमच्या जीवासाठी धोकादायक आहे. त्यामुळे या श्वानांना आपल्या घरात पाळताना सावध राहा.

0110

पिटबुल - हे खूप आक्रमक असतात. यांचं वजन सामान्यपणे 16-30 किलो असतं. जगातील जवळपास 41 देशांमध्ये या प्रजातीला पाळण्यास बंदी आहे. हा पाळीव आहे पण त्याला राग आल्यावर तो कुणाचाच नसतो. या कुत्र्याने लखनऊतील वृद्ध महिलेवर हल्ला करून तिचा जीव घेतला.

जाहिरात
0210

रॉट वेल्लर - हे खूप शक्तिशाली असतात आणि कुणालाही लगेच चावतात. यांचं वजन 35 ते 48 किलो असतं. या पाळण्यास अनेक देशांमध्ये बंदी आहे. पण भारतात बऱ्याच घरांमध्ये हा कुत्रा पाळला जातो.

जाहिरात
0310

जर्मन शेफर्ड - हे श्वान पोलीस विभागात जास्त असतात. हे गुन्हेगारांना पकडण्यात मदत करतात. यांचं वजन 30 ते 40 किलो असतं. हेसुद्धा बऱ्याच देशांमध्ये प्रतिबंधित आहे, पण यात भारत नाही.

जाहिरात
0410

डाबरमॅन पिन्स्चर - यांचाही पोलीस विभागात मदत घेतली जाते. तसंच हे घरात पाळलेही जातात. अनोळख्या व्यक्तींना पाहून हा चवताळतो. पण मालकावर नजर जातात तो शांतही होतो. अनेक देशांत हा प्रतिबंधित आहे.

जाहिरात
0510

बुलमास्टिफ - हे खूप आक्रमक असतात. यांचे पाय लांब असतात. 55 ते 60 किलो असतं. हे पिटबुलसारखेच दिसतात.

जाहिरात
0610

हस्की - हस्की दिसण्यात खूप क्युट आणि हुशारही असतात. यांना स्लेज डॉग म्हणतात जे बर्फाळ डोंगराळ प्रदेशात गाड्या खेचतात. त्यांना राग येतो तेव्हा खूप आक्रमक होता. यांचं वजन 20 ते 27 किलो असतं.

जाहिरात
0710

मालाम्युट - कुत्र्यांची ही प्रजाती उत्तर अमेरिकेत आढळते. हे लांडग्यासारखे दिसतात. यांचं वजन 50 किलो असतं. हे हुशार असतात पण तितकेच आक्रमकही.

जाहिरात
0810

वोल्फ हायब्रिड - लांडगा आणि कुत्रा यांच्यासारखे दिसतात. हे कुणावरही हल्ला करतात त्यामुळे बहुतेक देशांमध्ये यांना पाळण्यास मनाई आहे. यांचं वजन 36 ते 56 किलो असतं.

जाहिरात
0910

बॉक्सर - यांना शिकारी श्वानही म्हणतात. हे आपल्या शिकारीला जबड्यात धरून दहा मिनिटांतच लचके तोडतात. यांना सुरक्षेसाठी पाळलं जातं पण काही वेळा ते आपल्या मालकावरच हल्ला करतात. यांचं वजन 30 ते 32 किलो असतं.

जाहिरात
1010

ग्रेट डॅन - यांना ट्रेनिंगनंतर पाळलं जातं. हे खूप आक्रमक असतात. जर ट्रेनिंगशिवाय पाळलं तर हे तुमचा जीव घेऊ शतताच. यांना किलिंग मशीन म्हणूनही ओळखलं जातं. यांचं वजन 90 किलोपर्यंत असतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या