भारतातील 50 सुंदर महिलांमध्ये राजघराण्यातल्या या व्यक्तीचा समावेश झाला होता. 45 च्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या या राजकन्या कोण आहेत माहीत आहे का?
'फेमिना'ने भारतातील 50 सुंदर महिलांमध्ये या राजघराण्यातल्या व्यक्तीचं नाव आलं आहे. प्रियदर्शिनी राजे यांचा 8 मार्चला वाढदिवस. कोण आहे ही रॉयल फॅमिलीतली स्त्री?
प्रियदर्शनी राजे या बडोद्याच्या गायकवाड राजघराण्यातील राजकुमारी आहेत. त्यांच्या आईसुद्धा नेपाळच्या राजघराण्यातील होत्या.
प्रियदर्शनी राजे यांनी मुंबई मुंबईच्या सोफिया कॉलेजमधून आपलं महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आहे. त्या दिसासायला एखद्या अभिनेत्री इतक्या सुंदर आहेत.
प्रियदर्शनी राजे यांनी आता भाजपवासी झालेले मध्य प्रदेशातले मोठे नेते आणि खासदार ज्योतीरादित्य शिंदे यांच्याशी लग्नगाठ बांधली त्या वेळी त्या चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी ज्योतिरादित्य काँग्रेसमध्ये होते.
प्रियदर्शनी राजे यांचे वडील 'संग्राम गायकवाड' हे बडोद्याचे शेवटचे राजे प्रतापसिंह गायकवाड यांचे सुपुत्र आहेत.
प्रियदर्शनी यांनी 1994 मध्ये ज्योतीरादित्य शिंदे यांच्याशी विवाह केला होता. त्यांच्या प्रेमाचे किस्से खूपच प्रसिद्ध आहेत. त्यांना दोन अपत्ये आहेत.
ज्योतिरादित्य यांनी एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये प्रियदर्शनी यांना पहिल्यांदा पाहिलं होतं. आणि त्याचवेळी त्यांना त्या पसंत पडल्या होत्या.
मध्य प्रदेशच्या गुना मतदार संघातून त्यांना निवडणूक लढवण्यासाठी आग्रह देखील केला गेला होता. पण सक्रिय राजकारणात त्या अद्याप सहभागी झाल्या नाहीत.