JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / रंगांचा वापर करुन बरे होतील तुमचे रोग; जाणून घ्या काय असते कलर थेअरपी

रंगांचा वापर करुन बरे होतील तुमचे रोग; जाणून घ्या काय असते कलर थेअरपी

रंगांचा उपयोग करून रोग बरा करण्याच्या वैद्यकीय पद्धतीला कलर थेअरपी किंवा क्रोमो थेअरपी (Chromo therapy) म्हणतात.

0111

आपण बर्‍याच प्रकारच्या थेअरपींबद्दल ऐकतो, परंतु आपण कधी कलर थेअरपीबद्दल ऐकलं आहे का? कलर थेअरपी ही रंगांचा वापर करून रोग बरे करण्याची वैद्यकीय पद्धत आहे. त्याला क्रोमो थेअरपी असेही म्हणतात. ही थेअरपी शरीराच्या कोणत्याही भागावर रंगीत प्रकाश टाकून केली जाते. याशिवाय ही थेअरपी डोळ्यांना विशिष्ट रंग दाखवूनही केली जाते. डोळ्यांना कोणत्याही अतिरिक्त ताणापासून वाचवण्यासाठी हे फार काळजीपूर्वक केलं जातं.

जाहिरात
0211

रंग थेअरपी हा एक शांतता देणारा उपचार आहे, रंग थेरेपीमुळे आपलं मन आणि शरीर दोन्ही संतुलित करण्याव्यतिरिक्त, आरोग्यही चांगले राखण्यास मदत होते. रंग-थेअरपीमध्ये रंगांचे व्हायब्रेशनदेखील आपला मूडला बदलण्यासाठी उपयोगी ठरतात तसेच आपल्या एकूण आरोग्यावर अनुकूल परिणाम करतात. या थेअरपीचा उपयोग तणावग्रस्त लोकांची मने शांत करण्यासाठीदेखील केला जातो.

जाहिरात
0311

रंग थेअरपीमध्ये, सूर्याच्या किरणांना एका विशिष्ट रंगाच्या काचेतून रुग्णाच्या डोक्यावर सोडतात. उदाहरणार्थ, जर एखाद्यास उन्हाळ्यात ताप येत असेल तर शरीराचे तापमान वाढते, म्हणजेच शरीरात लाल रंग वाढला आहे. रंग थेअरपी करण्यासाठी आता रूग्णाची खोली बंद करून, निळ्या रंगाची काच खिडकीवर लावतात, त्यामधून सूर्याच्या किरणे आरपार गेल्यानंतर ती रुग्णाच्या डोक्यावर पडतील आणि ताप ठीक होऊन जाईल. हे शक्य नसेल तर काचेची एक पेटी बनवा आणि त्यात दूध, पाणी, तेल इत्यादी घाला. ह्यामध्ये एकच गोष्ट नीट लक्षात ठेवली पाहिजे की, आपल्याला रुग्णावर ज्या रंगांच्या किरणांचे उपचार करायचे आहेत तोच रंग काचेच्या पेटीला एकसारखा लावावा. बॉक्समधील किरणे पदार्थांमधून जातील आणि ते पदार्थ औषध म्हणून कार्य करतील. ही प्रक्रिया फार गुंतागुंतीची नाही.

जाहिरात
0411

भारतीय तत्त्वज्ञानात शरीरातील चक्र हे आध्यात्मिक शक्ती आणि उर्जेचं केंद्र मानलं जातं. सात रंगांचं वर्णन सात चक्रांचे प्रतिनिधी म्हणून केलं गेलं आहे. प्रत्येक रंगाचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे.

जाहिरात
0511

लाल रंग - हा रंग पाठीच्या कण्यासाठी असलेल्या चक्रासाठी वापरला जातो. हे चक्र मानव आणि पृथ्वीमधील संबंधासाठी ओळखलं जातं.

जाहिरात
0611

पिवळा रंग - पिवळा रंग हा सौर प्लेक्सस चक्राचं प्रतिनिधित्व करतो असं मानलं जातं की ते यकृत, पचन संस्था, पित्ताशय सशक्तीकरण आणि आरोग्याशी संबंधित आहे.

जाहिरात
0711

हिरवा रंग - हा रंग हृदयाच्या चक्रांचं प्रतिनिधित्व करतो. हे हृदय, फुफ्फुसं आणि रोगप्रतिकारक यंत्रणेशी जोडलेलं आहे. या व्यतिरिक्त हे मानसिक ध्यान, ऊर्जा आणि दया याच्याशी देखील जोडलेलं आहे.

जाहिरात
0811

केशरी - बेंबीच्या खाली दोन किंवा तीन इंचाच्या अंतरावर असलेल्या या चक्राला त्रिचक्र असं म्हणतात आणि हे चक्र केशरी रंगाने दर्शवलं जातं. हे मूत्रपिंड, प्रजनन आणि आनंदाशी संबंधित आहे.

जाहिरात
0911

निळा रंग - हा थायरॉईड आणि मेटाबोलिझमशी संबंधित आहे. या व्यतिरिक्त हे शांततापूर्ण एक्सप्रेशनचे प्रतिनिधित्वदेखील करतो.

जाहिरात
1011

इंडिगो - म्हणजे डोळ्याच्या आणि भुवयांच्यादरम्यान असलेल्या तिसर्‍या डोळ्याच्या चक्रासह याचा संबंध आहे. पिट्यूटरी ग्रंथी आणि पाइनल ग्रंथीशी संबंधित आहे. याचा परिणाम आपल्या झोपेच्या सायकलवर, तसंच ज्ञान आणि आत्म-सन्मान यावर होतो.

जाहिरात
1111

व्हॉयलेट रंग - हे क्राउन चक्रशी संबंधित आहे आणि डोक्याच्यावर स्थित असते. हे संवेदनशीलतेशी संबंधित आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या