JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / काय सांगता! आता तुम्ही बदलू शकता होणाऱ्या बाळाचं रंग-रूप, डिझायनर बेबीसाठी येतो इतका खर्च

काय सांगता! आता तुम्ही बदलू शकता होणाऱ्या बाळाचं रंग-रूप, डिझायनर बेबीसाठी येतो इतका खर्च

आता तुम्ही सुद्धा देऊ शकता डिझायनर बेबीला जन्म, येईल इतका खर्च.

0107

जेव्हा मूल जन्माला येणार असतं तेव्हा ते निरोगी जन्माला यावं अशी प्रत्येक आईची इच्छा असते. जेव्हा बाळ पोटात असतं तेव्हा त्याच्या आई-वडिलांना ही चिंता सतावत असते की त्यांच्या बाळात काही DNA कमी राहू नयेत आणि त्यामुळे त्यांच्या बाळाला काही त्रास होऊ नये. म्हणून आता डिझायनर बेबी (Designer Baby)भविष्यात खूपच उत्तम उपाय ठरणार आहे.

जाहिरात
0207

डिझायनर बेबी हे ते बाळ असतं ज्याच्या गुणसूत्रांमध्ये (Genes) बदल केलेला असतो. जेव्हा आजाराशी जोडलेले जीन्स बदलण्याची गरज पडते तेव्हा हे बदल केले जातात.हा बदल Zygote मध्ये केला जातो किंवा बाळाचे जीन्सच बदलले जातात. याप्रकारे बाळाचा चेहरा, गुण, शरीर यामध्ये बदल केले जाऊ शकतात. अशा कॉस्मॉटिक पद्धतीने जन्म दिलेल्या बाळाला डिझायनर बेबी म्हणतात. आताच्या काळात याची मागणी अधिकाधिक वाढत आहे.

जाहिरात
0307

डिझायनर बेबीला जन्म देण्याच्या प्रक्रियेची किंमत देखील बाजारपेठ आणि हेल्थ केअर इंडस्ट्रीच्या अंदाजानुसार निश्चित केली जाते. याशिवाय देश, हॉस्पिटल, लॅब आणि सर्व्हिसची पातळीदेखील किंमत निश्चित करण्यात मोठी भूमिका निभावतात. एका अंदाजानुसार इन-विट्रो फर्टिलायझेशनची (IVF) सरासरी किंमत सहा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. यात औषधे व इतर खर्च अतिरिक्त अडीच ते साडेतीन लाख रुपये असू शकतो. प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिसची सरासरी किंमत दोन लाख 60 हजारांपेक्षा जास्त असेल. त्याच वेळी, जेंडर सिलेक्शनची (मुलगा किंवा मुलगी) किंमत 13 लाखांपेक्षा जास्त आहे.

जाहिरात
0407

डिझाइनर बेबी किंवा बाळांमध्ये असे बदल सध्या अनेक देशांमध्ये कायदेशीररित्या वैध नाहीत. गर्भाशयात असलेलं बाळ मुलगा आहे की मुलगी आहे हे जन्मापूर्वीच तपासणं याबाबत चर्चा सुरू आहेत. पण इथं तर येथे बाळातील इतर सर्व गुणधर्म Zygoteच्या पातळीवर निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसंच जेनेटिक पातळीवर म्हणजेच जेनेटिक म्युटेशन करण्यालाही तीव्र विरोध होत आहे.

जाहिरात
0507

जर याला मान्यता मिळाली तरी डिझाइनर बेबीची संकल्पना दिसते तेवढी सोपी नाही आहे. यामध्ये चुका होण्याचे बराच धोका आहे. 2019 मध्ये, एका चिनी वैज्ञानिकाने जेनेटिकली मॉडिफाईड जुळं तयार करण्यास मदत केली. जेनेटिक बदल आता केले जाऊ शकतात, परंतु हे पूर्णपणे नियंत्रित कार्य आहे, असा दावा केला जाऊ शकत नाही. चुकांचे गंभीर परिणाम देखील येथे दिसून येऊ शकतात.

जाहिरात
0607

जर लोकांनी भविष्यात आपल्या मुलांमध्ये बदल करण्यास सुरवात केली, तर त्यांना बदल करून घेण्यासाठी बरेच पर्याय असतील, परंतु यामुळे जन्मलेल्या मुलांच्या हक्कांचं उल्लंघन होईल. आई-वडिलांनी आवडीच्या मशीनप्रमाणे मुलांमध्ये बदल करून घेणं बरोबर आहे का आणि माणसानी निसर्गाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणं योग्य आहे का अशी चर्चाही सुरू होईल.

जाहिरात
0707

हे तंत्र वापरायला सुरुवात केल्यानंतर श्रीमंत व्यक्तींना हे डिझायनर बेबी तंत्र वापरण्याची संधी मिळेल, परंतु गरिबांसाठी त्यांचा वापर अशक्य होईल. हळूहळू अशी वेळ येईल जेव्हा डिझाइनर बेबी आणि या संबंधित तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला गेला नाही तर श्रीमंत आणि गरीब यांच्यात आर्थिक आणि वांशिक फरक दिसू लागेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या