JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / कधी डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलंय का? कुणी, कधी आणि कसं घ्यावं Painkiller पाहा

कधी डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलंय का? कुणी, कधी आणि कसं घ्यावं Painkiller पाहा

छोट्या छोट्या दुखण्यावर तुम्ही पेनकिलर (Painkiller) घेत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती.

0116

डोकेदुखी, दातदुखी, शरीरदुखी, हलका ताप,  मायग्रेन, मासिक पाळीत वेदना अशा समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आपण सर्रासपणे पॅरासिटामोल (paracetamol) पेनकिलर घेतो. (फोटो सौजन्य - Canva)

जाहिरात
0216

कॅल्पोल (Calpol), क्रोसिन (Crocin), डोलो (Dolo), सुमो एल (Sumo L), काबिमोल (Kabimol), पॅसिमोल (Pacimol) अशा अनेक नावांनी हे पेनकिलर प्रसिद्ध आहेत.

जाहिरात
0316

पॅरासिटामॉलमध्ये स्टिरॉइड्स असतात, त्यामुळे त्याचा चुकीचा डोस तुमच्या आरोग्याला खूप हानी पोहोचवू शकतो. पॅरासिटामॉलच्या ओव्हरडोजमुळे काही वेळा साइड इफेक्ट्स देखील होऊ शकतो.  (फोटो सौजन्य - Canva)

जाहिरात
0416

पॅरासिटामोलच्या ओव्हरडोसमुळे अतिसार, जास्त घाम येणे, भूक न लागणे, अस्वस्थता, उलट्या, ओटीपोटात दुखणे, गोळा येणे, वेदना, ओटीपोटात पेटके येऊ शकतात.

जाहिरात
0516

पॅरासिटामॉलमुळे अॅलर्जी, त्वचेवर पुरळ उठणे, रक्ताचे विकार अशा समस्या असू शकतात. याशिवाय याच्या चुकीच्या वापरामुळे यकृत आणि किडनी खराब होण्याचा धोका असतो.

जाहिरात
0616

कोणतंही औषध कसं, कधी आणि किती घ्यावं याचं प्रमाण त्या व्यक्तीचं वय, वजन, उंची, व्यक्तीचे पूर्वीचे आजार, सध्या असलेल्या समस्या, वातावरण, आणि त्याला असलेल्या समस्या यावरही अवलंबून असतं. अगदी पॅरासिटामॉलही याला अपवाद नाही.  (फोटो सौजन्य - Canva)

जाहिरात
0716

ताप आणि वेदना यामध्ये पॅरासिटामॉलचा डोस कसा घ्यावा याबाबत Drugs.com ने सविस्तर माहिती दिली आहे.

जाहिरात
0816

यूएस मार्गदर्शक तत्त्वानुसार तापामध्ये 500 मिलीग्राम पॅरासिटामॉल 6 तासांनंतरच घ्यावे.  (फोटो सौजन्य - Canva)

जाहिरात
0916

सामान्य प्रौढ व्यक्तीला ताप असेल, तर , 4 ते 6 तासांच्या कालावधीत 325 मिलीग्राम ते 650 मिलीग्राम पॅरासिटामॉलचा डोस दिला जाऊ शकतो. जर हा वेळ 8 तासांपर्यंत असेल तर त्याला 1000 मिलीग्रामपर्यंत औषध दिले जाऊ शकते.  (फोटो सौजन्य - Canva)

जाहिरात
1016

जर मुलाला ताप असेल आणि एक महिन्यापेक्षा कमी वय असेल तर 10 ते 15 मिलीग्राम पॅरासिटामॉल प्रति किलो वजन 4 ते 6 तासांच्या अंतराने दिले जाते. हेच प्रमाण 12 वर्षांपर्यंतच्या मुलाला 6 ते 8 तासांच्या अंतराने द्यावे.  (फोटो सौजन्य - Canva)

जाहिरात
1116

वेदना कमी करण्यासाठी 500 मिलीग्राम औषध 4 ते 6 तासांच्या अंतराने घेतले पाहिजे.  (फोटो सौजन्य - Canva)

जाहिरात
1216

जर एखाद्या सामान्य प्रौढ व्यक्तीचं शरीर दुखत असेल तर 325 ते 650 मिलीग्राम पॅरासिटामॉल औषध 4 ते 6 तासांच्या अंतराने घ्यावे. त्याच वेळी, एक हजार मिलीग्राम औषध 6 ते 8 तासांच्या अंतराने घ्यावे.  (फोटो सौजन्य - Canva)

जाहिरात
1316

लहान मुलांसाठी 10 ते 15 मिलीग्राम प्रति किलो शरीराच्या वजनाच्या हिशोबाने 6 ते 8 तासांच्या दरम्यान दिले पाहिजे.  (फोटो सौजन्य - Canva)

जाहिरात
1416

वेबएमडीच्या बातमीनुसार, कोणत्याही प्रकारच्या वेदनांमध्ये पॅरासिटामॉल 10 दिवसांपेक्षा जास्त काळ घेऊ नये.  (फोटो सौजन्य - Canva)

जाहिरात
1516

यकृताची समस्या, किडनीची समस्या, अल्कोहोलची समस्या आणि कमी वजनाच्या बाबतीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पॅरासिटामॉल घेऊ नये.

जाहिरात
1616

जर तुम्ही तापामध्ये तीन दिवसांपासून पॅरासिटामोल औषध घेत असाल आणि ताप उतरत नसेल, तर ते लगेच सोडून द्या आणि डॉक्टरांशी संपर्क साधा.  (फोटो सौजन्य - Canva)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या