JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / स्वस्त झाली लिंबं; 3 सोप्या टिप्सने रस साठवून वर्षभर वापरा

स्वस्त झाली लिंबं; 3 सोप्या टिप्सने रस साठवून वर्षभर वापरा

लिंबू जास्त दिवस टिकत नाही. मात्र त्याचा रस कोणत्याही प्रिझर्वेटीव्हशिवाय टिकवता येतो.

019

लिंबू हा अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो जेवणाबरोबर लिंबाचं सरबत बनवून पितात. लिंबामध्ये व्हिटॅमीन सी, ऍन्टिऑक्सिडन्ट असतात. लिंबू इन्युनिटी बुस्टर आहे. थकवा जाणवत असेल तर एक ग्लास लिंबाचं सरबत प्यायल्यास रिफ्रेश वाटायला लागतं.

जाहिरात
029

वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मधाबरोबर घेतल्यास उपयोग होतो. पण, अनेक प्रकारे वापरता येणारे लिंबू प्रत्येक सिझनमध्ये स्वस्त असतात असं नाही. पावसाळ्यात लिंबाचा भाव कमी असतो.

जाहिरात
039

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबू अतिशय महाग होतात. गरज असेल तर, आपण मग बाजारामधून आपण प्रिजर्वेटीव्ह असलेला रस आणतो.

जाहिरात
049

लिंबू जरी जास्त दिवस फ्रीजमध्ये टिकवणं शक्य नसलं तरी लिंबाचा रस जास्त दिवस टिकवता येतो. यासाठी काही सोप्या पद्धतीचा वापर आपण करू शकतो.

जाहिरात
059

लिंबाचा रस एका बाऊलमध्ये काढा. त्यानंतर हा रस गाळून घ्या. गाळलेला रस काचेच्या भांड्यामध्ये भरून ठेवा. बाटली पूर्ण भरू नका. त्यात थोडी जागा रिकामी ठेवा. हा रस दोन आठवडे सहजपणे टिकतो.

जाहिरात
069

लिंबाचा रस काढल्यानंतर त्याच्या आईस क्यूब बनवता येऊ शकतात. याकरता लिंबाचा रस आईसट्रेमध्ये टाका आणि डीप फ्रिजमध्ये ठेवा. बर्फ तयार झाल्यानंतर काढून घ्या आणि एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून फ्रिजमध्ये स्टोअर करा.

जाहिरात
079

आवश्‍यकतेनुसार 1 आईस क्यूब काढून वापरू शकता. ही आईस क्यूब वापरून लेमोन वॉटर देखील सहजपणे बनवता येऊ शकतं.

जाहिरात
089

लिंबाचा रस बस 1 ते 2 महिना टिकवायचा असेल तर, हा उपाय करू शकता. दोन कप लिंबाच्या रसामध्ये एक चतुर्थांश मीठ घाला. लिंबाच्या रसाप्रमाणे मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता मीठ लिंबाच्या रसामध्ये व्यवस्थित मिसळून घ्या.

जाहिरात
099

यामुळे लिंबाच्या रसाची चव कडून होणार नाही. हा रस काचेच्या बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. आवश्यकतेनुसार लिंबाचा रस वापरू शकता. या पद्धतीने साठवलला रस दोन महिन्यांपर्यंत टिकू शकतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या