JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / शंभरी पार आजी-आजोबांनी एकत्र दिला कोरोनाशी लढा; घरीच उपचार घेऊन हरवलं व्हायरसला

शंभरी पार आजी-आजोबांनी एकत्र दिला कोरोनाशी लढा; घरीच उपचार घेऊन हरवलं व्हायरसला

या शंभरी पार आजी-आजोबांनी कोरोनाला कसं हरवलं ते पाहा.

0107

वाढलेलं वय, त्यात इतर आजार यामुळे वयस्कर व्यक्तींना कोरोनाशी लढताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यांना रुग्णालयात दाखल व्हावं लागतं. ऑक्सिजन, वेंटिलेटरची गरज पडते. पण शंभरी पार दाम्पत्याने मात्र कमालच केली. घरीच उपचार घेऊन त्याने कोरोनावर मात केली आहे.

जाहिरात
0207

कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्याच्या तंबरागुड्डी गावात राहणारे 103 वर्षांचे एरेन्ना आणि 101 वर्षांच्या एरेम्मा या नवरा-बायकोचा 15 दिवसांपूर्वी  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं नव्हती. त्यामुळे त्यांनी घरीच स्वतःला आयसोलेट केलं आणि उपचार घेतले.

जाहिरात
0307

12 दिवसांतच या दाम्पत्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. कोरोनाविरोधातील लढा यशस्वी केल्याने या दाम्पत्याच्या कुटुंबानेच नव्हे तर शेजाऱ्यांनीही आनंद साजरा केला आहे.

जाहिरात
0407

या दीर्घायुष्याचं रहस्य काय याबाबत अनेक जण या दाम्पत्याला विचारतात.  चांगलं आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचारच महत्त्वाचे आहेत. आम्ही साधं अन्न खातो आणि एकमेकांसोबत जास्त वेळ घालवतो. माझ्या तरुणपणात मी खूप कष्ट केलं आहेत. जर तुम्ही हृदयापासून आनंदी असाल तर तुम्हाला कशामुळेच नुकसान पोहोचणार नाही, असं एरप्पा यांनी सांगितलं.

जाहिरात
0507

तर एरम्मा सांगतात, आम्ही हेल्दी कसं राहतो पण आमच्याकडे या प्रश्नांची उत्तरं नाहीत. पण आमच्याकडे जे आहे, त्यात आम्ही समाधानी आहोत. देवाच्या कृपेने इतकी वर्षे आम्ही एकत्र आहोत.

जाहिरात
0607

त्यांचे शेजारी जयम्मा यांनी सांगितलं, या दोघांनीही आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना जे कोरोना नियम सांगितला, त्याचं तंतोतंत पालनं केलं. त्यामुळेच ते बरे झाले.

जाहिरात
0707

या दाम्पत्याला 7 मुलं आहेत. आपली मुलं, नातवंडं आणि पतवंडांसोबत ते राहतात.  जर इतके वयस्कर लोक बरे होऊ शकतात तर तरुणांनी घाबरण्याची काय गरज आहे, प्रत्येकासाठी हे दाम्पत्य एक प्रेरणा आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या