JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Independence Day 2021: जगातील आणखी 5 देश 15 ऑगस्टला साजरा करतात स्वातंत्र्य दिन

Independence Day 2021: जगातील आणखी 5 देश 15 ऑगस्टला साजरा करतात स्वातंत्र्य दिन

15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. पण फक्त भारतच नाही या देशांचाही याच दिवशी असतो स्वातंत्र्याचा उत्सव.

0107

15 ऑगस्टला भारत आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. मात्र भारतासह जगातील आणखी पाच देशही याच दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करतात.

जाहिरात
0207

भारताप्रमाणे दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, कांगो, बहरीन आणि लिक्टेस्टाइन हे देशही 15 ऑगस्टला स्वतंत्र झाले होते.

जाहिरात
0307

यूएस आणि सोव्हिएत फोर्सेजने 15 ऑगस्ट 1945 ला दक्षिण कोरियाची जपानपासून मुक्तता केली होती. त्यामुळे यादिवशी दक्षिण कोरिया आपला राष्ट्रीय दिन साजरा करतो.

जाहिरात
0407

दक्षिण कोरियाप्रमाणेच उत्तर कोरियाही 15 ऑगस्ट 1945 जपानच्या तावडीतून मुक्त झालं होतं.

जाहिरात
0507

15 ऑगस्ट 1971 ला बहरीन ब्रिटनपासून स्वतंत्र झालं होतं. 1960 च्या दशकापासून ब्रिटिश सैन्य बहरीन सोडून जात होतं. 15 ऑगस्टला बहरीन आणि ब्रिटनमध्ये करार झाला होता, त्यानंतर बहरीने स्वतंत्र देश म्हणून ब्रिटनसह आपले संबंध कायम ठेवले. बहरीन आपला नॅशनल हॉलीडे 16 डिसेंबर मानतं कारण यादिवशी बहरीनचे शासक इसा बिन सलमान अल खलीफा यांनी गादी मिळवली होती.

जाहिरात
0607

आफ्रिकेतील कांगो देश 15 ऑगस्ट 1960 ला फ्रान्सच्या राजवटीतून मुक्त झालं होतं. त्यानंतर रिपब्लिक ऑफ कांगो तयार झाला. 1880 पासून कांगोवर फ्रान्सची राजवट होती, त्यावेळी फ्रेंच कांगो म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर 1903 मध्ये मिडिल कांगो झाला.

जाहिरात
0707

जगातील सर्वात लहान देशांपैकी एक लिक्टेस्टाइन देश. 15 ऑगस्ट 1866 ला हा देश जर्मनीपासून मुक्त झाला आणि 1940 सालापासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या