आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांची माहिती देतोय तिथे तुम्ही बिनधास्त जाऊ शकता. या कडक उन्हाळ्यात ही ठिकाणं चांगला पर्याय आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यात. अनेक जण या सुट्टीत थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करतात.
आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांची माहिती देतोय तिथे तुम्ही बिनधास्त जाऊ शकता. या कडक उन्हाळ्यात ही ठिकाणं चांगला पर्याय आहेत.
काश्मीर - पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटलं जातं ते काश्मीर. तिथे तुम्ही नक्की जा. दल लेक, गुलमर्ग, सोनमर्ग इथला नजारा बघतच राहावा असं वाटतं.
लडाख - इथलं निसर्गसौंदर्य काही वेगळंच. बायकर्ससाठी हे आवडतं ठिकाण. इथला रोहतांग पास, नुब्रा व्हॅली, पँगाॅग लेक म्हणजे निसर्गाची अद्भुत सृजनशीलता. सुट्टीत लडाखला जाणं हा लाइफटाइम अनुभव आहे.
कुर्ग - कर्नाटकातलं कुर्ग अनेकांचं आवडतं ठिकाण आहे. मंडालपत्ती, तिब्बती मठ, कावेरी नदी, इरूपू फॉल, इगुथापा मंदिर, ओमकारेश्वर मंदिर, ब्रह्मागिरी डोंगर आणि नाल्कनद महल हे टुरिस्ट स्पाॅट आहेत. मंगलोर किंवा बंगळुरू विमानतळावरून टॅक्सी करून तुम्ही इथे येऊ शकता.
सिमला - बरेच जण सिमल्याला जाणं पसंत करतात. इथे तुम्ही विमानानं किंवा ट्रेननं येऊ शकता. 7 स्टार हाॅटेल्सपासून साध्या हाॅटेलचा पर्याय आहे.