लॉकडाऊनमध्ये सर्व लोक घरी असल्यानं सध्या भारतात इंटरनेटचा वापर वाढला आहे.
कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण देशच नाही तर जग सुद्धा ठप्प झाले आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व लोक घरी असल्यानं सध्या भारतात इंटरनेटचा वापर वाढला आहे.
एका सर्वेक्षणानुसार भारतातीय लोक लॉकडाऊनपूर्वी प्रतिदिन 150 मिनिटं इंटरनेट वापरत होते. मात्र लॉकडाऊननंतर यात लक्षणीय वाढ झाली.
लॉकडाऊनमध्ये लोकांनी सर्वाधिक कॉमिक आणि वाचनाशी संबंधीत अॅप्स डाउनलोड केल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
या व्यतिरिक्त लूडो किंग, टिकटॉक, जूम, व्हाट्सअॅप आणि UVIDEO यासारखी अॅप्स भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर डाउनलोड केल्याचं दिसून आलं आहे. (संकलन : मेघा जेठे.)