JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / गृहिणींना पावसाळ्यात बटाटे सडण्याची भीती? या पद्धतीने साठवण केल्यास No Tension

गृहिणींना पावसाळ्यात बटाटे सडण्याची भीती? या पद्धतीने साठवण केल्यास No Tension

पावसाळ्यात कितीही प्रयत्न केले तरी बटाट्यांना कोंब येतात किंवा सडतात. बटाटे जास्त दिवस टिकवण्यासाठी या टिप्स वापरून पहा.

0106

रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग असलेले बटाटे बहुतेक घरांमध्ये साठवले जातात. पण,काही लोकांना बटाटे कसे साठवून ठेवावेत हे माहिती नसतं. बटाटे घरामध्ये साठवण्याची योग्य पद्धत माहिती असेल तर, बटाटे कधीच खराब होत नाहीत.

जाहिरात
0206

बटाटे कधीच ओलसर ठिकाणी ठेवू नयेत किंवा त्यांना प्लास्टिकच्या पिशवीतही बांधून ठेवू नये. त्यातील ओलसरपणाने बटाटे पटकन खराब होऊ शकतात. बटाटे फ्रीजमध्येही ठेवू नका. फ्रीजमध्ये बटाट्यात असलेल्या स्टार्चचं साखरेत रुपांतर होतं. जे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

जाहिरात
0306

बटाटे जास्त काळ टिकवायचे असतील तर, घरी आणलेले बटाटे साठवण्यापूर्वी त्यातील खराब झालेले किंवा डाग असलेले बटाटे वेगळे करा. कारण एका सडलेल्या बटाट्यामुळे इतर बटाटे देखील खराब होऊ शकतात.

जाहिरात
0406

बटाटे साठवायचे असतील तर धुवू नेयेत. थोडे जरी ओले राहिले तर, बटाटे पटकन खराब होतात.

जाहिरात
0506

घरात बटाटे असताना आणखीन बटाटे आणले तर, दोन्ही बटाटे वेगळे ठेवा. यामुळे जुने बटाटे आधी संपतील.

जाहिरात
0606

घरात बटाटे असताना आणखीन बटाटे आणले तर, दोन्ही बटाटे वेगळे ठेवा. यामुळे जुने बटाटे आधी संपतील.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या