JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / PHOTO: फंगल इन्फेक्शनचा त्रास; करा हे 6 घरगुती उपाय

PHOTO: फंगल इन्फेक्शनचा त्रास; करा हे 6 घरगुती उपाय

उन्हाळ्यात आपल्याला अधिक घाम येतो आणि योग्य ती स्वच्छता घेतली नाही तर ‘हा’ आजार होण्याचा धोका अधिक असतो.

0108

उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यामुळे आपल्याला खूप घाम येतो. आपण आपल्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर वेगवेगळ्या आजारांना आपण नकळत निमंत्रण देत असतो. सध्या असाच एक आजार सगळीकडे झपाट्यानं पसरतो आहे.

जाहिरात
0208

झपाट्यानं वाढणारा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन. उन्हाळ्यात त्वचेची आणि स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर ह्या आजाराला तुम्ही निमंत्रण देऊ शकता. हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे तो जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. काही घरगुती उपाय तुम्ही पर्यायी म्हणून करू शकता

जाहिरात
0308

कडुनिंब- कडुनिंब हे बुरशी मारण्यासाठी उत्तम औषध आहे. कडुनिंबाचा पाला आंघोळीच्या गरम पाण्यात टाकावा. त्या पाण्यानं स्वच्छ आंघोळ करावी. कडुनिंबाच्या पानांची पेस्ट फंगल इन्फेक्शन झालेल्या जागी लावावी. रोज दोन कोवळी पानं खावी. त्यामुळे पोट साफ होतं.

जाहिरात
0408

तुरटी- फंगल इन्फेक्शनमध्ये सर्वात गुणकारी औषध म्हणजे तुरटी. तुरटीचं पाणी इन्फेक्शन झालेल्या जागी लावावं ते पुसून टाकू नये. आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवावी.

जाहिरात
0508

लसूण- अ‍ॅन्टीफंगल म्हणून लसूण काम करतं. ऑलिव्ह ऑइलमध्ये लसणीच्या पाकळ्यांचा रस काढून ते तेल लावावं.

जाहिरात
0608

कोरफडीचा गर काढून तो फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावावा. त्यामुळे खाज सुटणार नाही. त्वचेची आग होणार नाही. कोणताही साबण किंवा केमिकल असलेल्या क्रीम त्वचेवर लावू नका.

जाहिरात
0708

खोबरेल तेल- शुद्ध खोबरेल तेल फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावून मालिश करावी. दालचिनीचं तेल आणि खोबरेल तेल दोन्ही समप्रमाणात घेऊन लावावं. मात्र सगळ्या प्रकारच्या फंगल इन्फेक्शनला चालेल असं नाही त्यामुळे डॉक्टरांनी तेल लावू नये असं सांगितलं असेल तर डॉक्टरांचा सल्ला पाळावा.

जाहिरात
0808

स्वच्छ कोमट पाण्यानं दिवसातून दोन वेळा आंघोळ करा. कपडे स्वच्छ उन्हात सुकवा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कपड्याला इस्त्री करा. त्यामुळे कपड्यावरील फंगलचे विषाणू मरण्यास मदत होईल. फंगल इन्फेक्शनचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे तातडीनं डॉक्टरला दाखवून योग्य ते उपचार सुरू करावेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या