रक्तदाब कमी असणं देखील चिंतेची बाब असते. आरोग्यासाठीही हे धोकादायक आहे.
नॉर्मल ब्रडप्रेशर 120/80 असतो, पण, जेव्हा 90/60 पर्यंत ब्लड प्रेशर खाली येतो. तेव्हा त्याला हायपोटेन्शन किंवा लो ब्रडप्रेशर म्हणतात. ब्रडप्रेशर कमी झाल्यामुळे मेंदू,हृदय,फुफ्फुस,मूत्रपिंड या आवश्यक अवयवांना रक्त आणि ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होत नाही.
लो ब्लडप्रशरचा त्रास असेल तर, नाश्ता,दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यात घेतला जाणारा आहार 5 ते 6 भागात भाग करा. 2 जेवणादरम्यान जास्त अंतर ठेवू नका. रक्तदाब कमी होऊ नये यासाठी दिवसभरात थोडथोड जेवण घ्या किंवा थोड्यावेळाने खात रहा.
जास्त प्रमाणात मीठ खाणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण कमी रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यासाठी मिठाची आवश्यकता आहे. जेवणातील मिठाव्यतिरिक्त,दिवसभर 1 चमचा मीठ खावं.
उन्हाळ्यात जीममध्ये व्यायाम करताना नेहमी लिंबू पाण्यात 1 चिमूटभर मीठ घ्यालून प्यावं. व्यायाम केल्यावर अस्वस्थ वाटत असेल तर, ताबडतोब लिंबूपाणी प्यावं. आराम मिळेल.
शक्य तितक्या प्रमाणात लिक्वीड प्या. दररोज किमान २ ते 3 लिटर पाणी प्या. त्याशिवाय नारळपाणी,बेलाचं सरबत,पन्ह,लिंबूपाणी प्यावं.
बीपी कमी होत आहे असं वाटत असेल तर, ताबडतोब कॉफी किंवा चहा प्या. यामुळे रक्तदाब तात्पुरता सामान्य होईल आणि बरं वाटेल.
तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशियम,मॅग्नेशियम,व्हिटॅमीन सी असतं ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो,त्यामुळे बीपी कमी झाला तर लगेच 4 ते 5 तुळशीची पाने चघळा. त्वरित आराम मिळेल.
रात्री 4 ते 5 बदाम पाण्यात भिजवावे आणि सकाळी पाण्यात उकळावावेत. पाणी थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून प्यावी. याने रक्तदाब नियंत्रणात येईल.