Monsoon Gardening Tips: पावसाळ्यात झाडं चांगली वाढतात मात्र, या दिवसांमध्ये त्यांची तितकीच काळजी घ्यावी लागते.
पावसाळा झाडांच्या वाढीसाठी चांगला असला तरी याच दिवसात त्यांची काळजीही घ्यावी लागते. कारण या काळात रोपांवर अनेक प्रकारचे किडे होण्याची भीती देखील असते. पावसाळ्यात झाडं हिरवीगार रहावित यासाठी काही उपाय करता येतील.
पावसाळ्यात रोपांना गरजेनुसार पाणी द्यावं. आपल्या बागेत किंवा कुंड्यांमध्ये जास्त पाणी जमा होणार नाही याची खबरदारी घ्या. अति पाणी झाडांचं नुकसान करू शकतं.
किड पडल्यामुळे पावसाळ्यात रोपांचं बरंच नुकसान होतं. यासाठी कडू लिंबाच्या तेलाचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणून करू शकतो.. यामुळे झाडांना कोणताही वाईट परिणा होत नाही.
रोपांच्या चांगल्या वाढीसाठी, रासायनिक खताऐवजी कंपोस्ट खताचा वापर करावा. कंपोस्ट तयार करण्यासाठी वनस्पतीची पानं, शिळं अन्न यांचा उपयोग केला जातो.
पावसाळ्यात रोपांची चांगली काळजी घ्यावी. खराब पान फांद्या कापाव्यात. योग्यवेळी कटिंग केल्याने झाडांची वाढ चांगली होते.