JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / पावसाळ्यात नको दमट कपड्यांचं Tension; ‘या’ सोप्या उपायांनी घालवा कपड्यांची दुर्गंधी

पावसाळ्यात नको दमट कपड्यांचं Tension; ‘या’ सोप्या उपायांनी घालवा कपड्यांची दुर्गंधी

पावासाळ्यात सगळ्यांनासाठी मोठी ठरणारी समस्या (Problem) म्हणजे कपड्यांना येणारी दुर्गंधी, कितीही प्रयत्न केला करी पावसाळ्यात कपड्यांना येणारा वास (Clothes Smell) जात नाही.

0107

पावसाळ्यात कपडे न वाळल्याने त्यांना अतिशय दुर्गंधी (Clothes Smell) यायला लागते. अशात रोज धुतलेले कपडे कसे वाळवायचे हीच अडचण गृहिणींसमोर असते. त्यामुळे असे कपडे बाहेर घालून जाणंही अशक्य असतं.

जाहिरात
0207

दमट वातावरणात कपड्यांना लवकर वास येऊ लागतो. अशा कपड्यांमध्ये बॅक्टेरियाही वाढतो. त्यामुळे स्किन इनफेक्शनचा धोकाही वाढतो. कपड्यांना येणाऱ्या दमट वासाला त्रासले असाल तर, या टिप्स जरूर वापरा.

जाहिरात
0307

पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत. अशावेळी कपडे धुतल्यानंतर मोकळ्या जागेत वाळत घाला. पंख्याच्या हवेवरही कपडे सुकवू शकता. यामुळे कपड्यांना दुर्गंध येणार नाही.

जाहिरात
0407

दमट हवेने ओल्या कपड्यांना दुगंध येऊ लागते. अशा परिस्थितीत कपडे धुवताना लिंबाचा रस वापरल्यास कपड्यांना घाण वास येणार नाही.

जाहिरात
0507

पावसात भिजलेले किंवा वापरलेले कपडे घातल्यास त्यांना जास्त वास येतो. त्यामुळे असे कपडे साठवून ठेवू नका. भिजलेले कपडे लगेच धुवून टाका.

जाहिरात
0607

त्यामुळे त्यात बॅक्टेरिया वाढणार नाही. असे कपडे चुकूनही कपाटात किंवा गोळाकरून ठेवू नका. यामुळे इतर कपड्यांनाही वास येतो.

जाहिरात
0707

बेकिंग सोडा वापरून पावसाळ्याच्या दिवसांत धुतलेल्या कपड्यांना येणारी दुर्गंध दूर करता येते. याकरता कपडे धुवताना डिटर्जंट बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर वापरा. लगेचच फरक दिसेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या