JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत; तुम्हाला हेल्दी ठेवेल असा पावसाळ्यातील आहार

सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत; तुम्हाला हेल्दी ठेवेल असा पावसाळ्यातील आहार

Monsoon Health Tips : पावसाळ्यात आजारांना दूर ठेवायचं असेल तर आहारही महत्त्वाचा आहे.

0117

आपल्या शरीरावर ऋतूनुसार होणाऱ्या वातावरणातील बदलांचा नक्कीच परिणाम होत असतो. आता नुकताच पावसाळा सुरू झाला आहे वातावरणातील सूर्याची उष्णता कमी होते आणि पाण्याचा अंश वाढत जातो. हवेत थंडावा वाढतो.

जाहिरात
0217

या कालावधीत शरीरातील वात वाढतो आणि पित्त जमा होण्यास सुरुवात होते. तसंच पचन शक्ती कमी होते. प्रतिकार शक्ती कमी आणि वातावरणातील जंतुसंसर्ग वाढल्याने आजार वाढतात.

जाहिरात
0317

या काळात आजारांपासून वाचण्यासाठी आहार हलका घ्यावा. ज्वारी, जव , नाचणी, गहू इ. धान्यांची भाकरी किंवा चपाती तुपाबरोबर घ्यावी.

जाहिरात
0417

दुधी, शिराळी, घोसाळी, पडवळ, कोहळा अशा वेलभाज्यांचा आहारात समावेश असावा.

जाहिरात
0517

चणा, वाटाणा, हरभरा, पावटा, राजमा इ. कडधान्यांचा वापर करू नये. मूग तसंच कमी प्रमाणात मटकी, मसूर, कुळीथ इ. कडधान्ये शरीरातील वात न वाढवता सहज पचतात.

जाहिरात
0617

फळांपैकी संत्री, मोसंबी, जांभूळ, सफरचंद, आंबा अशी गोड आंबट रसांची फळे दिवसा खावीत.

जाहिरात
0717

सकाळी ग्लासभर कोमट पाणी लिंबू पिळून प्यावं.

जाहिरात
0817

थंड पाणी पिऊ नये. दिवसभर उकळवून गार झालेलं किंवा कोमटच पाणी प्यावं. तसंच तुळशीपत्र टाकलेलं आणि तुरटी फिरवलेलं पाणी प्यावं.

जाहिरात
0917

नाश्ता किंवा जेवण भुकेनुसार घ्यावं.

जाहिरात
1017

फलाहार, दलिया तसंच भाज्यांचं सूप इ. सुंठ, आलं किंवा मिरी घालून घ्यावं.

जाहिरात
1117

आहारात गोड, कडू, हलके पदार्थ खावेत.

जाहिरात
1217

मुगाबरोबर किंवा जेष्ठमधाचे चूर्ण घालून दही घ्यावं.

जाहिरात
1317

ताकात सुंठ, जिरं, चिमूटभर मिरी घालून दुपारी प्यावं.

जाहिरात
1417

पुदिना, लसूण चटणीचा समावेश असावा.

जाहिरात
1517

रात्रीचं जेवण शक्य तेवढं लवकर घ्यावं. जेवणानंतर हरडे चूर्ण पाच ग्रॅम आणि सैंधव यांचं मिश्रण कोमट पाण्याबरोबर घ्यावं.

जाहिरात
1617

शरीरातील वात नियंत्रित ठेवण्यासाठी औषधी तेलाने मसाज करावा तसंच बस्तीसारख्या पंचकर्माची मदत घ्यावी.

जाहिरात
1717

आयुर्वेदातील आहार-विहार पालन आणि पंचकर्माच्या मदतीने शरीरातील दोषांचं नियंत्रण करून विविध आजारांपासून बचाव होईल आणि अखंड आरोग्य मिळेल, असं वेदिक्युर हेल्थकेअर अँड वेलनेसच्या आयुर्वेदाचार्य डॉ. वैशाली सावंत चव्हाण यांनी सांगितलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या