JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / जाडी वाढेल म्हणून तूप खाणं टाळता? रोज खा साजूक तूप; वजन वाढणार नाही तर होईल कमी

जाडी वाढेल म्हणून तूप खाणं टाळता? रोज खा साजूक तूप; वजन वाढणार नाही तर होईल कमी

तुपाने शारीरिक (Physical strength) आणि मानसिक (Mental health) आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळेच आयुर्वेदात (Ayurveda) तुपाला महत्त्व आहे.

0110

वजन वाढेल या भीतीने तूप न खाणाऱ्यांसाठी ही माहिती महत्वाची आहे. तूपामध्ये व्हिटॅमिन ए, डी असतं. कॅल्शियम,फॉस्फरस,झिंक पोटॅशियम कॉन्जुगेटेड लिनोलेईक ऍसिडही असतं. यामुळे वजन तर, कमी होतंच शिवाय कॅन्सर होण्याचा धोकाही कमी होतो.

जाहिरात
0210

पोटाचे आजार असलेल्यांसाठी तूप खाण्याने फायदा होतो. ज्यांना पोट साफ न होण्याचा त्रास असेल त्यांनी रोज रात्री झापण्याआधी 1 ग्लास कोमट दुधात 2 चमचे तूप घालून प्यावं. आयुर्वेदानुसार योग्य प्रमाणात दररोज तूप खाल्ल्यास पचनशक्ती चांगली होते.

जाहिरात
0310

तूप खाणाऱ्याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं. यामुळे अनेक आजार दुर पळतात. रोग प्रतिकारशक्ती सुधारते.

जाहिरात
0410

शारीरिक ताकद वाढवण्यासाठी तूप खाण्याचा फायदा होतो. जे लोक दररोज व्यायाम करता किंवा मेहनतीचं काम करतात त्यांनी रोज तूप खावं.

जाहिरात
0510

लहान मुलांच्या जेवणात तूपाचा समावेश करावा. तूप खायला दिल्यास लहान मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होण्यात फायदा होतो.

जाहिरात
0610

पुरुषांना लैंगिक दुर्बलता जाणवत असेल त्यांनी साजूक तूप खावं. रात्री झोपण्याआधी 2 चमचे तूप आणि मध मिसळून खाल्लाने शरीरिक ताकद आणि वीर्य वाढते.

जाहिरात
0710

तूपामुळे शारीरात एनर्जी वाढते. तुपामध्ये मीडियम-चेन-फॅटी ऍसिडसह अनेक पौष्टिक घटक आहेत,जे यकृतात शोषले जातात.

जाहिरात
0810

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तूप खायलाच हवं. नियमित खाल्ल्यास स्मरणशक्ती काढते आणि मानसिक आजार कमी होतात.

जाहिरात
0910

गर्भवती महिलांनी तूप खायला हवी. यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाचं आरोग्य चांगलं राहतं. गर्भात बाळाची वाढ चांगली होते.

जाहिरात
1010

शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तूप खावं. तूपात गुड कोलेस्ट्रॉल असतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती न बाळगता. योग्य प्रमाणात तूप खावं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या