तुळशीची पानं(Basil leaves)औषधी गुणांसाठी ओळखली जातात. तुळशीच्या पानांनी इम्युनिटी (Immunity)वाढते. अनेक प्रकारच्या गंभीर आजारातही फायदा होतो.
तुळशीचं दूध (Tulsi Milk)प्यायल्यास आपण कोणत्या आजारांपासून बचाव करू शकतो. तुळशीची पानं दुधात उकळवून प्यायल्याने डोकेदुखी किंवा मायग्रेनसारख्या आजारांमध्ये आराम मिळतो.
कोरोना (Corona)काळात लोक तुळशीच्या पानांचा काढा पिऊन आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करत आहेत. तुळशीची पानं कच्ची खाण्याबरोबर दुधात उकळून प्यायल्यास अधिक फायदेशीर ठरतात.
तुळशीचं दूध बनवण्यासाठी आधी दीड ग्लास दूध उकळावावं. दूध उकळल्यानंतर त्यात 8 ते 10 तुळशीची पानं घालावीत आणि आणखी काही वेळ उकळवून आर्धा ग्लास करावं. दूध कोमट असताना प्यावं.
तुळशीची पानं दुधात उकळवून प्यायल्याने डोकेदुखी किंवा मायग्रेनसारख्या आजारांमध्ये आराम मिळतो. बराच काळ मायग्रेनचा त्रास असेल तर, दररोज चहाऐवजी दुधात तुळशीची पानं घालून उकठळून प्यावी.
तुळशीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात. ऑफिसच्या कामामुळे तणाव येत असेल किंवा कौटुंबिक कलहामुळे डिप्रेशन वाढलं असेल तर, दुधात तुळशीची पानं उकळून प्यावी. असं केल्याने डिप्रेशनचा त्रास कमी होईल
तुळशीच्या पानांमध्ये असलेलं ऍन्टीऑक्सिडेंट शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतं. याशिवाय तुळशीमध्ये असणारे ऍन्टीबॅक्टीरियल आणि ऍन्टीवायरल गुणधर्म सर्दी,खोकल्यापासून बचाव करतात.
तुळशीची पानं दुधात उकळवून प्यायल्यास हृदय निरोगी राहतं. दररोज रिकाम्या पोटी तुळशीचं दूध प्यायल्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना भरपूर फायदा होतो.
श्वासोच्छवासासंबंधी त्रास होत असेल तर तुळशीचं दूध नक्कीच प्या. हा घरगुती उपचार बदलत्या हवामानामुळे होणार्या त्रासांपासून आपल्याला दूर ठेवते.