JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / तणावामुळे हैराण आहात? 'या' 5 नैसर्गिक वस्तू Stress करतील दूर; औषधाची पडणार नाही गरज

तणावामुळे हैराण आहात? 'या' 5 नैसर्गिक वस्तू Stress करतील दूर; औषधाची पडणार नाही गरज

मानसिक ताण आपल्या आरोग्याबरोबर सौंदर्याचही नुकसान करतो. यासाठी औषधांऐवजी काही उपाय फायदेशीर आहेत.

0108

मानसिक ताणावामुळे, आरोग्यावर आणि सौंदर्यावर परिणाम होतो. म्हणूनच, तणावाचा त्रास शुल्लक वाटला तरी, दूर करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे.

जाहिरात
0208

मानसिकताण वाढला तर आजारपणही वाढतात. शिवाय डाबेटिज, हृदयरोग होण्याती भीती असते.

जाहिरात
0308

मानसिक ताणामुळे आरोग्य आणि सौंदर्याचं नुकसान होऊ नये,यासाठी तणाव दूर करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण, त्यासाठी औषधांऐवजी काही इतर गोष्टीही फायदेशीर ठरू शकतात.

जाहिरात
0408

तणाव कमी करण्यासाठी सुगंधाचा वापर करू शकता. यासाठी आंघोळ करण्यापूर्वी बाथ टब किंवा बादलीतील पाण्यात लॅव्हेंडर,गुलाब,चमेली या सुवासिक फुलांच्या पाकळ्या टाका किंवा आवडीनुसार लॅव्हेंडर,गुलाब,चमेली,मोगरा तेलाचे काही थेंब टाकू शकता.

जाहिरात
0508

तणावमुक्त राहण्यासाठी चांगलं संगीत ऐका. आपल्या आवडीनुसार नवीन किंवा जुनी गाणी ऐका. गाणी ऐकण्यामुळे तुमच्या मनातील निगेटीव्ह विचार निघून जातील.

जाहिरात
0608

तणाव दूर करण्यासाठी तेलाने स्कॅल्पची मॉलिश केल्यास खूप फायदा मिळतो. मॉलिश करण्यासाठी ब्राह्मी किंवा भृंगराज तेल वापरू शकता किंवा बदाम,ऑलिव्ह आणि नारळ तेल देखील वापरू शकता. यामुळे तणाव कमी होईल आणि झोपही शांत लागेल.

जाहिरात
0708

तणावमुक्तीसाठी बॉडी मसाज हा देखील चांगला पर्याय आहे. बॉडी मसाजसाठी बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. आवडत असेल तर, सुगंधी तेलाचे काही थेंब टाकू शकता.

जाहिरात
0808

मॉलिशने मानसिक तणाव दूर होण्यात मदत होईल, शरीराचा थकवा जाईल आणि मूडही चांगला होऊन झोपही चांगली लागेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या