अद्यापही काही महिलांना मॅन्स्ट्रूअल कप आणि टॅम्पोन (Menstrual Cups &Tampons) काय भानगड आहे हेच कळत नाही. नेमकं काय वापरावं हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
महिला किंवा तरुण मुली पाळीच्या समस्येबद्दल बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे पाळीच्या काळात घ्यायची काळजी, स्वच्छता किंवा तेव्हा काय वापराणं आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे हे मुलींना माहितीही नसतं.
आपल्याकडे आजही सॅनिटरी पॅड वापरणंच सुरक्षीत मानलं जातं. तर, मॅन्स्ट्रूअल कप आणि टॅम्पोन या दोन्हीमुळे योनीमधील पातळ पडदा फाटण्याची शक्यता असते. त्यातच आपल्या देशात मुलींच्या व्हर्जिनिटीबद्दल फार संभ्रम पहायला मिळतो.
मॅन्स्ट्रूअल कप आणि टॅम्पोनमुळे योनीतला पातळ पडदा फाटला तर, त्याचा ती मुलगी व्हर्जिन नाही असा समज होऊ शकतो. याच भितीने मुली मॅन्स्ट्रूअल कप आणि टॅम्पोनचा वापर टाळतात.
पण, तसं पाहिल तर सॅनिटरी पॅड लिकजे होण्याची भिती असतेच. मॅन्स्ट्रूअल कप खर्चाचा विचार करता परवडणारे असतात. सॅनिटरी पॅड प्रमाणे दर महिन्याला विकत आणवे लागत नाहीत. त्यांच्या मुळे पर्यावरणाला हानीही पोहचत नाही.
मॅन्स्ट्रूअल कप वेगवेगळ्या साईझमध्ये येतात. ते आपल्या योनीमध्ये ठेवावं लागतं. या कपमध्ये पाळीच्या काळात होणारा रक्तस्त्राव साठतो. काही ठरावीक काळानंतर हा कप काढून स्वच्छ करावा लागतो. मॅन्ट्रूअल कप वापरताना स्वच्छतेची काळजी घ्यावी. कारण स्वच्छता न पाळल्यास योनीला संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे मॅन्ट्रूअल कप वापरताना आपले हात स्वच्छ धुवावेत.
मॅन्ट्रूअल कपचा पुढचा भाग थोडासा दुमडून योनीच्या आत सरकवा. मॅन्ट्रूअल कप योनी आणि गर्भाशयाचं तोंड यात फिट बसायला हवं. आत गेल्यानंतर मॅन्ट्रूअल कपला थोडसं हलवावं.
मॅन्ट्रूअल कप सिलीकॉनपासून बनलेला असल्याने त्यामुळे तुम्ही सहजतेनं वापरू शकता. पण, काही काळाने मॅन्ट्रूअल कप काढून रिकामं करावं आणि स्वच्छ करुन पुन्हा वापरावं.
टॅम्पोन कापसापासून यामुळेही पिरेडच्या काळात टेन्शन फ्री राहता येतं. टेम्पोन आपल्या योगीमध्ये गेल्यावर पाळीच्या काळात होणारा रक्तस्त्राव शोषून घेतो.
टॅम्पोन योनीमध्ये अडकतो. रक्तस्त्राव व्हायला लागल्यावर फुगतो. मात्र टॅम्पोन आकाराने छोटा असल्याने अगदी आत पडद्या पर्यंत जात नाही. याच्या मागच्या बाजूला एक धागा असतो. ज्यामुळे टॅम्पोन सहजणे बाहेर काडता येतो