JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / पिझ्झा-पास्त्यावर आवडीने खाताय Oregano? साईड इफेक्ट माहिती आहे ना?

पिझ्झा-पास्त्यावर आवडीने खाताय Oregano? साईड इफेक्ट माहिती आहे ना?

तुम्हालाही पिझ्झा,पास्ता आणि सॉसमध्ये ओरेगॅनो(Oregano) वापरण्याची सवय आहे का? पोटदुखी,गॅस, स्किन ऍलर्जीसारखे त्रास होण्याबरोबर आणखीनही बरेच त्रास होऊ शकतात.

0107

बहुतेक लोकांना असं वाटतं की ऑरेगॅनो शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. पण, ओरेगॉनचा केवळ फायदाच होत नाही तर, बर्‍याच वेळा त्रासही होतो.

जाहिरात
0207

जास्त आणि सतत ओरेगॅनो खाणं टाळावं. दररोज किंवा जास्त प्रमाणात ओरेगॅनो खाण्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. जे हायपोग्लिसेमियाच्या आजाराने त्रस्त आहेत अशांनी ओरेगॅनो खाऊ नये.

जाहिरात
0307

जास्तवेळा ओरेगॅनो खाल्ल्याने किंवा त्याचा त्वचेवर थेट वापर केल्याने स्किन एलर्जीचा धोका संभवतो. जास्त प्रमाणात खाल्ल्यानेही स्किन एलर्जी होते.

जाहिरात
0407

ओरेगॅनो त्वचेवर लावण्यामुळे त्वचेची जळजळ,लालसरपणा,खाज सुटणे अशा समस्या होऊ शकतात.

जाहिरात
0507

सतत ओरेगॅनो खाल्ल्यामुळे पोटाच्या तक्रारी होण्याची शक्यता असते. यामुळे पोटदुखी,अपचन,गॅस,बद्धकोष्ठता तसंच ओटीपोटात दुखण्याची समस्या होऊ शकते.

जाहिरात
0607

ओरेगॅनो जास्त प्रमाणात खाल्लास काही जखम झाल्यास जास्त रक्तस्त्रावा होण्याची समस्या आहे. ज्यांना रक्तस्त्राव किंवा जखम झाल्यामुळे रक्तस्त्राव बंद न होण्यास त्रास होत असेल त्यांनी ओरेगॅनो खाणं टाळलं पाहिजे.

जाहिरात
0707

गरोदरपणात ओरेगॉन खाणं टाळलं पाहिजे. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात जास्त ओरेगॅनो खाल्ल्याने रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते,ज्यामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या