JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / सतत थकवा जाणवणं असू शकते धोक्याची घंटा; 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेचं असेल लक्षण

सतत थकवा जाणवणं असू शकते धोक्याची घंटा; 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेचं असेल लक्षण

व्हिटॅमीन बी 12 (Vitamin B12) हा शरीरासाठी महत्वाचा घटक आहे. त्यामुळे आपल्या शरीरात रक्त्तातील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या रेड ब्लड सेल्सचं उत्पादन वाढतं.

019

व्हिटॅमीन बी 12 शरीरात कमी झालं तर, त्याची लक्षणं दिसायला लागतात. पण, त्याकडे लक्ष न दिल्यास शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडतं. व्हिटॅमीन बी 12 कमी झाल्यास वारंवार तोंड येण्याची समस्या सुरु होते. सतत थकवा वाटणं हे व्हिटॅमीन बी 12च्या कमतरतेचं लक्षण आहे.

जाहिरात
029

पोटासंबंधी आजार म्हणजे शौचास न होणे किंवा अपचन असा त्रासाही या व्हिटॅमीनमुळे होऊ शकतो. स्मरणशक्ती कमी होणं, मूड स्विंग, हातापायांना मुंग्या येणं, वजन वाढणं, कंबर आणि पाठीचं दुखणं हे देखील व्हिटॅमीन बी 12 च्या कमतरतेचं लक्षण आहे.

जाहिरात
039

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता धोकादायक असते असं तज्ज्ञांच मत आहे. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असलेल्या लोकांना अशक्तपणा जास्त जाणवतो. इतकंच नाही तर, त्यांची हाडंही कमजोर होतात. यामुळे गर्भवती महिलांनाही त्रास होतो. बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासावरही व्हिटॅमिन बी 12च्या कमीचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

जाहिरात
049

मांसाहारी पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी 12 जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे शाकाहारी लोकांना मांसाहारी लोकांपेक्षा व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचा जास्त त्रास होतो.

जाहिरात
059

मद्यसेवन करणाऱ्या आणि ऍसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन बी 12ची कमतरता जास्त असते.

जाहिरात
069

डेअरी प्रोडक्ट, सोयाबीन आणि ऍनिमल प्रोडक्टमध्ये व्हिटॅमिन बी 12 असतं. शाकाहारी लोकांनी दुध आणि पनीरचं सेवन करावं. दररोज एक ग्लास दुध प्यायल्यास शरीराला 20 टक्के व्हिटॅमिन बी 12 मिळतं.

जाहिरात
079

अंड्याच्या पिवळ्या भागात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 मिळतं. त्यामुळे रोज एक अंडं खावं. गोड्या पाण्याच्या माशांमधूनही व्हिटॅमिन बी 12 मिळतं. यात प्रोटीन, गुड फॅट असतं. चिकन, मासे, टर्की, मटन यातही व्हिटॅमिन बी 12 असतं.

जाहिरात
089

बीट खावं यात व्हिटॅमिन बी 12 जास्त असतं. याशिवाय बीटमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, आयर्न आणि कॅल्शियम असतं.

जाहिरात
099

मशरूममध्ये व्हिटॅमिन बी 12 भरपूर असतं. थकवा जाणवत असेल तर, मशरूम खावेत. यात व्हिटॅमिन डी, जर्मेनियम, नियासिन, पोटॅशियम आणि फॉस्फरस सुद्धा असतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या