JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / काही लोकांना असू शकते रोटी, चपाती, पोळीचीही अ‍ॅलर्जी; Gluten Sensitive असल्याचं कसं ओळखाल?

काही लोकांना असू शकते रोटी, चपाती, पोळीचीही अ‍ॅलर्जी; Gluten Sensitive असल्याचं कसं ओळखाल?

आपल्या रोजच्या जेवणातल्या पदार्थामधील ग्लूटेनमुळे (Gluten) काहींच्या शरीराला किती नुकसान (Harmful) होतं याची माहिती जाणून घेऊ या.

जाहिरात

रात्रीच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असणारे पदार्थ टाळा. हे पदार्थ पचण्यास अतिशय जड असतात. त्यामुळे पोटात गॅस तयार होतो. रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो भाज्या आणि फळांचा वापर करा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली,03:बाजारामधून आणलेल्या पादार्थांवर ग्लूटेन फ्री (Gluten Free) असा टॅग असतो. पण, हे ग्लूटेन म्हणजे नक्की काय आहे ? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो?  हे माहिती आहे का? ग्लूटेन एक कलेक्टिव टर्म आहे जी प्रोलेमीन प्रोटीनचा एक भाग आहे. ग्लूटेन गहू, जव, तांदूळसारख्या पदार्थांमध्ये असतात. ग्लूटेन गरम झाल्यावर त्यातला चिकटपणा जास्त वाढतो. ग्लूटेनमुळे आरोग्याला नुकसान (Damage to Health)पोहचतं. ज्यांना सीलिएक(Celiac)सारखा आजार आहे त्यांनातर ग्लूटेनने जास्ता त्रास होतो. ग्लूटेनमुळे धोका आपण कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर, ग्लूटेन फ्री आहार घ्यावा. सीलीएक, व्हीट एलर्जी,इरीटेबल बाऊल सिंड्रोम असे त्रास असतील तार ग्लूटेनयुक्त पदार्थ खाऊ नयेत. जरी कोणताही आजार किंवा त्रास नसेल तरीही ग्लूटेन असलेले पदार्थ कमी खावेत किंवा या पदार्थांबरोबर फायबर,न्‍यूट्रिशनयुक्त पदार्थही घ्यावेत. ( शेवग्याच्या शेंगा नव्हे पानं आहेत बहुगुणी; BP च्या गोळ्या घेत असाल तर हे वाचाच ) ग्लूटेन सेन्सिव्हिटी म्हणजे काय? संशोधनानुसार गव्हामधील ग्लूटेन प्रोटीन पोटाच्या आतील कोशिकांमध्ये  प्रतिकूल क्रिया करत असेल तर त्याला ग्लूटेन सेन्सेटिव्हिटी म्हणतात. या पदार्थांमध्ये असतं ग्लूट ग्लूटेनचा वापर खाद्यपदार्थांना घट्टपणा येण्यासाठी आणि स्टॅबेलाईझ करण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्याचं वर्गीकरण शक्य नाही , पण, साधारणपणे प्रोसेस्ड फूड मध्ये ग्लूटन जास्त असतं. ब्रेड, पिझ्झा, पास्ता, ब्रेडक्रम्स, नूडल्स, व्हेजी बर्गर, पेस्ट्री, कुकीज यात ग्लूटेन असतं. गहू, जव, गव्हाचा रवा, सोया सॉस, बीयर, फ्लेवर्ड चिप्स, काही सॅलड ड्रेसिंग, काही मिक्स मसाले. काही प्रकारच्या वाईन मध्येही ग्लूटेन असतं. ( लैंगिक संबंधांवेळी त्याचा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर; दुखापत पाहून डॉक्टरही शॉक ) ग्लूटन फ्री फ संशोधकांच्यामते, ग्लूटेन फ्री डाएट ग्लूटेनयुक्त पदार्थांच्या तुलनेत चांगले असतात. यात जास्त प्रमाणात आयर्न,फॉलिक ऍसिड आणि इतर पोषक घटक असतात. कमी फायबर, साखर जास्त असते. असे पदार्था जास्त महाग असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या