JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / स्वादुपिंडाच्या चांगल्या आरोग्यासाठी असा घ्या आहार; अ‍ॅसिडिटीचा त्रास होईल कमी

स्वादुपिंडाच्या चांगल्या आरोग्यासाठी असा घ्या आहार; अ‍ॅसिडिटीचा त्रास होईल कमी

पँक्रियाज म्हणजेच स्वादुपिंड पचनास मदत (Food Digestion) करणाऱ्या हार्मोन्स (Hormone) आणि एन्जाईमच्या (Enzyme) उत्पादनात मदत करतं. त्याचबरोबरच शरीरामध्ये ते ब्लड शुगर निर्मितीच्या प्रक्रियेवर नियंत्रण देखील ठेवतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 जुलै: पँक्रियाज म्हणजे स्वादुपिंडाचं काम आपलं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे. पचन व्यवस्थेचा (Digestive System) महत्त्वाचा आणि छोट्या आकड्यांचा पहिला भाग म्हणजेच स्वादुपिंड किंवा पँक्रियाज (Pancreas). पोटात छोट्या आतड्यांच्या पुढच्या भागांमध्ये स्वादुपिंड असतं. स्वादुपिंड अन्नपचनास मदत करणाऱ्या हार्मोन्स  (Hormone) आणि एन्जाईमच्या (Enzyme)  उत्पादनास मदत करतं. शरीरात निर्माण होणाऱ्या ब्लड शुगरच्या निर्मितीवर देखील नियंत्रण ठेवण्यास मदत करतं. शरीरातील फॅट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट कमी करण्यासाठी शरीरात  डायजेस्टिव्ह एन्जाईम निर्माण करण्याचं काम पँक्रियाज करतं. शरीरात कार्बोहायड्रेट कमी झाले नाहीत, तर वजन वेगाने वाढणं, थकवा येणं हे त्रास व्हायला लागतात. कसा असावा आहार - कोबी, ब्रोकोली, मुळा, पालक आणि टोमॅटो सारख्या भाज्या खाल्ल्यामुळे स्वादुपिंडाला फायदा होतो. लसून देखील स्वादुपिंडाचासाठी उत्तम मानला जातो. यामध्ये अ‍ॅन्टी एम्फ्लामेन्ट्री (Anti-Inflammatory) गुण असतात. ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. घरात बनवलेलं साजूक तूप, आव्होकाडो, नारळ तेल आणि ऑलिव्ह ऑईल खाल्ल्यामुळे देखील स्वादुपिंडाला फायदा होतो. काकडी, टरबूज, स्ट्रॉबेरी, किवी ही फळं खाल्ल्यामुळे पँक्रियाजला फायदा होतो. अ‍ॅसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी चहा-कॉफी टाळून हर्बल टी किंवा कॉफीन फ्री प्येय घ्यावीत. कॅफीनमुळे स्वादुपिंडमध्ये अ‍ॅसिडिटी निर्माण करणारे पदार्थ तयार होतात. जंक फूड खाण्यामुळे स्वादुपिंडाला डायजेस्टिव्ह एन्जाईमची निर्मिती करण्यात जास्त ताकद लावावी लागते. याशिवाय अ‍ॅसिडिटी आणि पचनाच्या समस्याही होऊ शकतात. त्यामुळे जंक फूड दररोज खाऊ नये. शरीरात पाणी कमी झालं तर स्वादुपिंडाला सूज येते. त्यामुळेच पँक्रियाजच्या पेशी कायम हायड्रेट असणं आवश्यक असतं. त्यामुळे दिवसभरामध्ये 8 ते 10 ग्लास पाणी प्यावं. रात्री उशिरा जेवल्यामुळे स्वादुपिंडाच्या प्रक्रियेवर दबाव येतो. याशिवाय उशिरा जेवल्यामुळे वजनही वाढतं. त्यामुळे योग्य रात्रीचं जेवण योग्य वेळी घ्या. स्वादुपिंडाचं काम उत्तम राहण्यासाठी भरपूर आराम करावा आणि शक्य असल्यास लंघन किंवा उपवास करावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या